Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

महायुती व महाआघाडीतील सर्वच पक्षाच्या इच्छुकांनी दाखल केले उमेदवारी अर्ज; काँग्रेस व शिंदे शिवसेनेची डोकेदुखी वाढली

12

Maharashtra Election 2024: विधासनभा निवडणुकीत अक्कलकुवा मतदारसंघातून काँग्रेस आणि शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. या मतदारसंघातून सर्व इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत.

Lipi

नंदुरबार(महेश पाटील): अक्कलकुवा मतदारसंघात महायुती व महाआघाडीतील बिघाडी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या मतदारसंघात महाआघाडीतर्फे काँग्रेसला तर महायुती तर्फे शिंदे शिवसेनेला जागा मिळाली आहे. असे असताना महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या व अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्या इच्छुक उमेदवारांनी ही अर्ज दाखल केले आहे. यावेळी शिंदे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष यांनीही अर्ज दाखल केला. तर महा आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उभाठातर्फे महिला जिल्हाध्यक्षसह माजी जिल्हाध्यक्षांनीही उमेदवारी दाखल केल्याने काँग्रेस व शिंदे शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे.

राज्यातील प्रथम क्रमांकाचा मतदारसंघ असलेल्या अक्कलकुव्यात महाआघाडीतर्फे ही जागा काँग्रेसला मिळाली आहे. तर महायुतीतर्फे शिंदे शिवसेनेला देण्यात आली आहे. काँग्रेस तर्फे ॲड.के.सी.पाडवी यांना तर शिंदे शिवसेनेततर्फे आमदार आमश्या पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली. अशा असताना ही जागा आम्हाला मिळावी. अशी मागणी करत भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. हिना गावित यांनी भाजपातर्फे व अपक्ष असे दोन नामांकन दाखल केले. त्यातच हा शेवटच्या दिवशी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे रतन पाडवी यांनीही उमेदवारी दाखल केली.
अनेकांना उपमुख्यमंत्री केले, पण सुप्रियाला एकही पद दिले नाही; शरद पवारांचा अजितदादांना टोला- सर्व सर्वाधिकार दिले मात्र…
महायुतीतील बिघाडी एवढ्यावर न थांबता शिंदे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष किरसिंग वसावे यांनीही पक्षातर्फे तसेच अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यामुळे महायुतीत मोठ्या प्रमाणावर बिघाडी झाल्याचे चित्र दिसत आहे. असे असताना महाआघाडी तर्फे काँग्रेस तर्फेच उमेदवारी दाखल करण्यात आली होती. मात्र शेवटच्या दिवशी उबाठातर्फे महिला जिल्हाध्यक्ष रीना पाडवी यांच्यासह जिल्हा परिषद सभापती तथा माजी जिल्हा प्रमुख गणेश पराडके यांनीही अपक्ष उमेदवारी जाहीर केल्याने महायुतीप्रमाणेच महाआघाडीतील बिघाडी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
पती रवी राणांचा अर्ज भरताना नवनीत राणा झाल्या भावूक; केले मोठे वक्तव्य, माझ्या पराभवामुळे…
दरम्यान जिल्ह्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला एकही जागा न मिळाल्याने तसेच काँग्रेस विश्वासात घेत नसल्याचे कारण देत. जिल्हाभर काँग्रेसचा प्रचार करणार नसल्याचे जिल्हा युवक अध्यक्ष संदीप परदेशी यांनी याआधी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यातील प्रथम क्रमांकाचा मतदार संघात 17 अर्ज दाखल करण्यात आले आहे.

शिंदे शिवसेनेतील विरोधक आले जवळ

अक्कलकुवा मतदारसंघात शिंदे शिवसेनेत दोन गट होते. एक गट विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी तर दुसरा गट माजी आ.चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाध्यक्ष किरसिंग वसावे , विजयसिंग पराडके यांचा होता. दरम्यान आमदार आमश्या पाडवी यांना उमेदवारी मिळवण्यासाठी आमदार आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.
देवेंद्र फडणवीस हे आधुनिक युगातले जनरल डायर; रोहित पवारांची सडकून टीका, भाजपच्या सर्व्हेचा म्हणतो- आमचा उमेदवार…
आज शेवटच्या दिवशी आमदार आमश्या पाडवी यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी दाखल केली. त्यावेळी माजी आ. चंद्रकांत रघुवंशी उपस्थित होते. तर अक्कलकुवा जिल्हाध्यक्ष किरसिंग वसावे , विजयसिंग पराडके अनुपस्थित राहिले.विजयसिंग पराडके व किरसिंग वसावे काय भूमिका घेतात हे आगामी काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. मात्र शिंदे शिवसेनेतील विरोधक असलेले आमदार आमश्या पाडवी व चंद्रकांत रघुवंशी एकत्र आले आहेत.

जयकृष्ण नायर

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.