Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मुख्यमंत्रिपदासाठी कुणाला पसंती? फडणवीस तिसरे, काका पवारांना दादांहून अधिक मतं, टॉपवर कोण?

5

Maharashtra Vidhan Sabha Election : युती-आघाडीचे सीएमपदाचे फॉर्म्युलेही समोर आलेले नाहीत. त्यामुळे उत्सुकता ताणली गेली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी बाजी मारणार की महायुती, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाप्रमाणेच सर्वसामान्य नागरिकांना लागली आहे. यंदा युती आणि आघाडीत प्रत्येकी तीन-तीन प्रमुख पक्ष असल्यामुळे निवडणुकांची रंगत वाढली आहे. याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी, परिवर्तन आघाडी, एमआयएम, रासप, जरांगे फॅक्टर अशा अनेक पैलूंमुळे निवडणुका बहुरंगी आणि अभूतपूर्व झाल्या आहेत.

महाविकास आघाडी किंवा महायुती यांनी आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. महायुतीने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणुका लढवणार असल्याचं सांगितलं असलं, तरी विजय मिळाल्यास मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, हे अद्याप स्पष्ट नाही. युती-आघाडीचे सीएमपदाचे फॉर्म्युलेही समोर आलेले नाहीत. त्यामुळे उत्सुकता ताणली गेली आहे.

विधानसभा निवडणुकीचे अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सी-वोटरचा सर्व्हे समोर आला आहे. मुख्यमंत्री म्हणून मतदारांनी कुठल्या नेत्याला सर्वाधिक पसंती दर्शवली आहे, याबाबत सर्वेक्षणातून माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांना सर्वाधिक पसंती मिळाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर उद्धव ठाकरे, तिसऱ्यावर देवेंद्र फडणवीस आहेत. विशेष म्हणजे चौथ्या क्रमांकावर शरद पवार, तर पाचव्यावर अजित पवार आहेत.

कुणाला कुठून किती टक्के पसंती?

एकनाथ शिंदे
मुंबई – २५.३ टक्के
कोकण – ३६.७ टक्के
एकूण – २७.५ टक्के

C Voter Survey Maharashtra : मुख्यमंत्रिपदासाठी कुणाला पसंती? फडणवीस तिसऱ्या नंबरवर, शरद पवारांना दादांहून अधिक मतं, टॉपवर कोण?

उद्धव ठाकरे
मुंबई – २३.२ टक्के
कोकण – २६.३ टक्के
मराठवाडा – २२.३ टक्के
उत्तर महाराष्ट्र – २३.३ टक्के
विदर्भ – २३.२ टक्के
पश्चिम महाराष्ट्र – २०.७ टक्के
एकूण – २२.९ टक्के

देवेंद्र फडणवीस
मुंबई – १४.८ टक्के
कोकण – १०.४ टक्के
विदर्भ – १३.७ टक्के
एकूण – १०.८ टक्के
Manoj Shinde : केदार दिघेंची डोकेदुखी वाढली, काँग्रेसची बंडखोरी, ४० हजार मतं मिळवणारा नेता अपक्ष रिंगणात
अजित पवार
मुंबई – ०.८ टक्के
कोकण – ०.९ टक्के
मराठवाडा – २.४ टक्के
उत्तर महाराष्ट्र – २.५ टक्के
विदर्भ – २.४ टक्के
पश्चिम महाराष्ट्र – ६.६ टक्के
एकूण – ३.१ टक्के
Avinash Jadhav Net Worth : साडेनऊ कोटींची स्थावर मालमत्ता, राज ठाकरेंचे शिलेदार अविनाश जाधव यांची संपत्ती किती?
शरद पवार – ५.९ टक्के
बाळासाहेब थोरात – १.५ टक्के
आदित्य ठाकरे – १.२ टक्के
अशोक चव्हाण – ०.५ टक्के

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.