Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एका चिकन पीसची किंमत थेट मृत्यू… उल्हासनगरात भयंकर घडलं, मित्रानेच मित्राला संपवलं

4

Ulhasnagar Friend Killed Friend: चिकन खात असताना एका पीसवरुन भांडण झालं आणि मित्राने थेट आपल्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उल्हासनगर येथे ही भयंकर घटना घडली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

ठाणे: पार्टीत एका चिकन पीसवरुन वाद होऊन एका मित्राने दुसऱ्या मित्राची हत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. उल्हासनगरमध्ये रविवारी रात्री ही घटना घडल्याची माहिती आहे. चिकनवरून झालेल्या वादातून एका २४ वर्षीय तरुणाने मित्राची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. राजा इब्राहिम शेख (४७) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. तर अफरोज मोहम्मद शेख उर्फ राहुल असं आरोपी मित्राचं नाव असल्याची माहिती आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी मित्राला अटक केली आहे.

उल्हासनगर येथील कॅम्प तीनमधील काजल पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडल्याची माहिती आहे. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मित्राला अटक करण्यात आली आहे. गेल्या पाच दिवसात उल्हासनगरात तिसरी हत्येची घटना घडल्याने परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे.
Coimbatore: माझ्यात सुपरपॉवर… इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची हॉस्टेलच्या चौथ्या मजल्यावरुन उडी अन् मग…
याप्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत राजा इब्राहिम आणि आरोपी शेख हे उल्हासनगरच्या कॅम्प नंबर तीन या भागात राहत होते. ते दोघंही खूप चांगले मित्र होते. रविवारी (२७ ऑक्टोबर) राजा इब्राहिम यांनी जेवणासाठी चिकन पार्सल आणलं. त्यानंतर मृत राजा इब्राहिम आणि आरोपी शेख हे दोघेही मित्र काजल पेट्रोल पंपाजवळ जेवायला बसले. जेवत असताना त्या दोघांचं चिकनचं एक पीस जास्त घेण्यावरुन वाद झाला. एका चिकनच्या पीसवरुन सुरु झालेला हा वाद इतका विकोपाला गेला की त्यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर रागाच्या भरात आरोपी शेखने राजा इब्राहिम यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली.

Thane Crime: एका चिकन पीसची किंमत थेट मृत्यू… उल्हासनगरात भयंकर घडलं, मित्रानेच मित्राला संपवलं

या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करुन त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. घटनेच्या काही वेळातच पोलिसांनी आरोपी शेखला बेड्या घातल्या. पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी याबाबतची माहिती दिली. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. चिकनचा एक पीस हे एकच कारण होतं, की राजा इब्राहिम यांच्या हत्येमागे आणखी काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

नुपूर उप्पल

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.