Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अलिबागमध्ये ‘पैशाचा पाऊस’, गोंधळपाडा रस्त्यावर पाचशेच्या नोटा, नागरिकांनी हातोहात उडवल्या

5

Alibaug Notes Found in Diwali : कर्जत येथील एक्साइज कार्यालयाची महिला कर्मचारी या रस्त्यावरून जात असताना ही बाब त्यांच्या निदर्शास आली.

Lipi

अमूलकुमार जैन, रायगड : अलिबाग नजीकच्या गोंधळपाडा रस्त्यावर बुधवारी पैशांचा पाऊस पडला. मात्र या पैशांचे मालक कोण हे मात्र समजू शकले नाही. यावेळी त्या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांची दिवाळी झाली. अवघ्या काही मिनिटांत या रस्त्याने जाणाऱ्यांनी पडललेले पैसे उचलून नेल्याचे सांगण्यात आले. हजारो रुपये घेऊन वाटसरु पसार झाले आहेत.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांवर राजकीय पक्ष किंवा उमेदवार यांच्याकडून ‘पैशांचा पाऊस’ पाडला जाऊ नये, यासाठी निवडणूक आयोग लक्ष ठेवून आहे. अशातच रायगडमध्ये हा प्रकार समोर आला आहे.

महिलेला रक्कम दिसली

दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कर्जत येथील एक्साइज कार्यालयाची महिला कर्मचारी या रस्त्यावरून जात असताना ही बाब त्यांच्या निदर्शास आली. त्यांना अडीच हजार रुपये मिळाले. त्यांनी ही रक्कम अलिबाग पोलिस ठाण्याच्या मार्शल बिटकडे सुपूर्द केली.
Nawab Malik : महायुतीची चाल, नवाब मलिक निव्वळ ढाल? आझमींचा गड खालसा करण्यासाठी ‘बुलेट’स्वारी

पाचशेच्या नोटांची मोठी रक्कम

अलिबागजवळील गोंधळपाडा रस्त्यावर दुपारी तुरळक रहदारी सुरू होती. या रस्त्यावर पाचशे रुपयांच्या नोटा पसरलेल्या दिसल्या. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार ५०० रुपयांच्या नोटांची मोठी रक्कम होती. या नोटा पाहून यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्यांनी त्या हातोहात लंपास केल्या.

Notes found on road : अलिबागमध्ये ‘पैशाचा पाऊस’, गोंधळपाडा रस्त्यावर पाचशेच्या नोटा, नागरिकांनी हातोहात उडवल्या, अखेर…

नोटा परत करण्याचं आवाहन

दरम्यान, रस्त्यावर पडलेल्या या नोटा निवडणुकीसाठी वापरल्या जाणार होत्या, की कुठल्या सामान्य माणसाची वर्षभराची कमाई होती, याबाबत चर्चा सुरु झाली आहे. एखाद्याच्या पिशवीतून ही रक्कम पडली असावी, दिवाळीचा पगार किंवा कामगारांचा बोनस असू शकतो त्यामुळे ज्यांना कोणाला ही रक्कम मिळाली आहे त्यांनी अलिबाग पोलिसांकडे ही रक्कम सुपूर्द करून माणुसकी दाखवावी असेही म्हटले जात आहे.
Sharad Pawar vs Ajit Pawar : कुठे काका-पुतण्या, कुठे गुरु-शिष्य आमनेसामने; ५२ पैकी ३५ जागांवर अजित दादांपुढे शरद पवारांचं थेट आव्हान

सांगलीतील प्रकाराची पुनरावृत्ती

याआधी सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात गदिमा पार्क समोरुन जाणाऱ्या ओढ्याच्या पाण्यातून पाचशे रुपयांच्या नोटा वाहून आल्याचा प्रकार समोर आला होता. पाचशे रुपयांच्या नोटा गोळा करण्यासाठी आटपाडीतील शनिवारच्या बाजारासाठी आलेल्या लोकांनी गर्दी केली होती. अनेक जणांना पाचशे रुपयांच्या नोटा सापडल्या होत्या, नोटा शोधण्यासाठी नाल्याच्या ठिकाणी लोकांची गर्दी झाली होती.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.