Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Ajit Pawar vs Vijay Shivtare: लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेला अजित पवार विरुद्ध विजय शिवतारे यांच्यात धुसफूस पाहायला मिळत आहे. त्याचा फटका महायुतीला बसण्याची शक्यता आहे.
पुरंदरमध्ये महायुतीकडून शिंदेसेनेचे विजय शिवतारे अधिकृत उमेदवार असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं संभाजी झेंडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता निर्माण झाली आहे. महायुतीचे दोन उमेदवार असल्याचा फायदा काँग्रेसच्या संजय जगताप यांना होऊ शकतो. तेच इथले विद्यमान आमदार आहेत. गेल्या निवडणुकीत जगताप यांनी शिवतारेंचा पराभव केला होता. त्यावेळी शिवतारेंच्या पराभवासाठी अजित पवारांनी पूर्ण ताकद लावली होती. अरे शिवतारे यावेळी तू कसा निवडून येतो तेच मी बघतो, असं म्हणत अजित पवारांनी शिवतारेंना थेट आव्हान दिलं होतं. अजित पवारांनी त्यांचा शब्द खरा करत शिवतारेंचा पराभव घडवून आणला.
Rohit Patil: आर आर रा… आबांच्या लेकाला पाडण्यासाठी ‘खतरनाक’ प्लान; तासगावात ‘रायगड पॅटर्न’
अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्यातील वाद शमवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली. त्यांनी तह घडवून आणला. पण आता हा तह मोडल्यात जमा आहे. शिवतारे महायुतीचे अधिकृत उमेदवार असताना अजित पवारांनी त्यांच्या विरोधात संभाजी झेंडे यांना तिकीट दिलं आहे. याबद्दल शिवतारे यांनी त्यांची नाराजी बोलून दाखवली.
Maharashtra Election 2024: मंत्रालयात फडणवीसांची नेमप्लेट तोडणाऱ्या महिलेचा उमेदवारी अर्ज; त्यात भाजपचा उल्लेख, पण…
विजय शिवतारेंनी अजित पवारांना लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी दिलेल्या शब्दाची आठवण करुन दिली. ‘लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही तिघेही एकत्र बसलो होतो आणि तेव्हा तिघांनी शब्द दिलेला आहे, पुरंदरचा पुढील किल्लेदार हा विजयबापू शिवतारे असेल. आता हे तिघांचे शब्द आहेत. अजितदादा तिथे बाजूला बसलेले होते. जर दादांनी अशा प्रकारे फॉर्म दिलेला असेल तर तो राष्ट्रवादीकडून महायुतीला तडका आहे. म्हणजे महायुती तुम्ही मानत नाही का?,’ असा सवाल शिवतारेंनी विचारला.
Ajit Pawar vs Vijay Shivtare: तू निवडून कसा येतो तेच बघतो! युतीत असूनही अजितदादा बापूंना पाडणार? लोकसभेचा शब्द मोडणार?
संभाजी झेंडेंना उमेदवारी म्हणजे अजित पवारांची वैचारिक दिवाळखोरी असल्याची टीका शिवतारेंनी केली. ‘ज्या व्यक्तीनं सुनेत्रा पवारांच्या विरोधात प्रचंड ताकद , पैसा लावून त्यांना पाडण्यासाठी प्रयत्न केले, त्या व्यक्तीला उमेदवारी देत असाल तर ते दुर्दैव आहे, ती वैचारिक दिवाळखोरी आहे. याच ठिकाणी जर दिगंबर दुर्गाडे असते किंवा प्रतिकूल काळात दादांना साथ देणाऱ्या कार्यकर्त्याला तिकीट दिलं असतं तर मला काही वाटलं नसतं. पण ही उमेदवारी म्हणजे निव्वळ वैचारिक दिवाळखोरी आहे,’ अशा शब्दांत शिवतारे अजित पवारांवर बरसले.