Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मनसेच्या साथीने भाजपचा मुख्यमंत्री, राज ठाकरेंचे मोजक्या शब्दात पाच छुपे संदेश!

5

Raj Thackeray on Devendra Fadnavis : भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका राज ठाकरेंनी निवडणुकीआधीच मांडली आहे. यातून त्यांनी एकप्रकारे निकालानंतर युतीसाठी चर्चेची कवाडंच खुली ठेवली आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचा मुख्यमंत्री होईल आणि तो आमच्या साथीने होईल, असे भाकित मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी वर्तवले. आमची माणसं सत्तेत बसतील, असं सूचक विधानही राज ठाकरेंनी यावेळी केलं. त्यानंतर काही मिनिटांतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक इन्स्टा स्टोरी पोस्ट केली. यात त्यांनी राज ठाकरेंसोबतचा फोटो शेअर केला. या स्टोरीला सरकार चित्रपटातील ‘साम दाम दंड भेद’ गाणं लावण्यात आलं होतं. या स्टोरीची आणि त्याआधी राज ठाकरेंनी मांडलेल्या भाकिताची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

लोकसभेला बिनशर्त पाठिंबा

याची सुरुवात कुठून झाली पाहूया. लोकसभा निवडणुकीच्या आधीही राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, यासाठी भाजपला पाठिंबा दिला होता. इतकंच नाही, तर शिवसेना आणि भाजप यांच्या उमेदवारांसाठी प्रचारसभाही घेतल्या होत्या. त्यापैकी नारायण राणे, मुरलीधर मोहोळ यासारख्या काही सीट्सही आल्या.

त्याच वेळी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे हेवीवेट नेते अमित शाह यांच्याशी राज ठाकरे यांनी सुपुत्र अमित ठाकरे यांच्यासह दिल्लीत जाऊन गाठभेट घेतली होती. तेव्हापासून मनसे-भाजप दिलजमाईच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. अमित ठाकरेंचं संसदीय राजकारणातील लाँचिंग तेव्हापासूनच सुरु झाल्याचं बोललं जातं.

स्वबळावर, तरी सत्तेचं स्वप्न

आता विधानसभा निवडणुकीत मनसे स्वबळावर मैदानात उतरली असली, तरी भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका राज ठाकरेंनी निवडणुकीआधीच मांडली आहे. यातून त्यांनी एकप्रकारे निकालानंतर युतीसाठी चर्चेची कवाडंच खुली ठेवली आहेत. कारण मनसे आणि भाजप यांना सत्ता काबीज करण्यासाठी एकमेकांची सारखीच गरज भासू शकते.
Amit Thackeray : …तर अमित ठाकरेंचं नुकसान होईल असं त्यांना वाटतं, फडणवीसांनी सरवणकरांच्या मनातलं सांगितलं

भाजपने पेरलेले उमेदवार

मुंबईत विधानसभेच्या अधिकाधिक जागा जिंकण्याचा भाजपचा चंग आहे. राज्यात भाजप १४८ जागा लढवत असली, तरी भाजपचे किमान १८ उमेदवार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या ‘घड्याळ’ चिन्हावर रिंगणात उतरले आहेत. २०२९ मध्ये स्वबळावर सत्तेत येण्याचं स्वप्न पाहणाऱ्या भाजपने आतापासून तजवीज सुरु केल्याची चर्चा आहे.

२८८ जागा असलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेत बहुमताचा आकडा १४५ आहे. भाजपचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मिळून १६० उमेदवार रिंगणात आहेत. याशिवाय महायुतीत जागा सोडलेले छोटे मित्रपक्ष आणि काही अपक्ष यांची साथ भाजपला आहेच. त्यातही काही जागा कमी-जास्त झाल्यास मनसेचा पर्याय खुला राहतो.

MNS-BJP : मनसेच्या साथीने भाजपचा मुख्यमंत्री, राज ठाकरेंचे मोजक्या शब्दात पाच छुपे संदेश!

मनसे-भाजप युती शक्य

विधानसभा असो किंवा आगामी मुंबई महापालिका निवडणुका, भाजपला मनसेची साथ आवश्यक आहे. राज ठाकरेंनी मोजक्या शब्दात पाच गोष्टी सांगितल्या. मनसे आणि भाजप यांची युती का शक्य आहे. पहिलं म्हणजे, शिवसेना-भाजप यांच्याशी हिंदुत्ववादी विचारधारा जुळत असल्याने भविष्यात एकमेकांसाठी मतं मागतानाही त्यांना कुठली अडचण येणारी नाही. याशिवाय दुसरी गोष्ट ही की, ठाकरे गटावर कुरघोडी करण्यासाठी भाजपसाठी ठाकरे फॅक्टर महत्त्वाचा आहे. तिसरं म्हणजे, मनसेच्या साथीने ठाकरेंच्या पॉकेटमधील मराठी मतदार वळवण्यासाठी भाजपला मदत होणार आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट ही, की मनसे-भाजप यांच्यात एकमेकांवर उघड टीका करताना फारसे दिसत नाहीत.

पाचवी गोष्ट लक्षात घ्यायला हवी, अमित ठाकरे यांची रस्ता मोकळा करण्यासाठी खासदार नारायण राणेंपासून, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि खुद्द देवेंद्र फडणवीस ही राज ठाकरेंची भाजपमधील मित्रमंडळी सरसावली आहेत. शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी, यासाठी भाजपकडून दबाव आणला जात आहे. राज ठाकरेंनी मैत्र जपत एकनाथ शिंदेंविरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला, ही अमित ठाकरेंविरुद्धचा उमेदवार हटवण्याची हिंट देण्यासाठीच.
Ravi Raja : दिवाळीत काँग्रेसमध्ये मोठा बॉम्ब फुटला, माजी विरोधीपक्ष नेत्याचा राजीनामा, भाजपात प्रवेश

मनसेचे उमेदवार सत्तेत बसतील?

तिकडे बाळा नांदगावकर यांच्यासमोर महायुतीने उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे ‘मनसेच्या साथीने भाजपचा मुख्यमंत्री’ झाला, तर अमित ठाकरे, बाळा नांदगावकर यांच्यासाठी रेड कार्पेटची तयारी केली जात आहे. म्हणजेच भाजपची निकालात सरशी झाली, तर मनसेच्या साथीने नव्या युतीचं सरकार येणार का? असा सवाल विचारला जात आहे.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.