Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नोव्हेंबर सुरु होताच महागाईचा झटका, पत्नी मागच्या तर पती समोरच्या सीटवर, धडकी भरवणारी घटना

6

Daily Top 10 Headlines in Marathi; रोजच्या ताज्या ठळक बातम्या: सकाळच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सचा थोडक्यात आढावा, पुढील लिंकवर क्लिक करुन वाचा सविस्तर बातमी

१. ‘राज्यात महायुतीचेच सरकार येईल,’ असा दावा करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीत ‘इनकमिंग’ वाढणार आहे, असे प्रतिपादन गुरुवारी केले. काँग्रेस नेते रवी राजा यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. याशिवाय ठाकरे गटाच्या बाबू दरेकर यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला. बातमी वाचा सविस्तर…
२. जळगाव येथील रावेर मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार शमिभा पाटील या पक्षाच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या राज्यातील पहिल्याच तृतीयपंथी अधिकृत उमेदवार ठरल्या आहेत. राज्याच्या ६४ वर्षांच्या इतिहासात एखाद्या पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून तृतीयपंथी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची ही पहिलीच वेळ आहे.

३. काँग्रेस पक्षातील जवळपास ४४ वर्षांचा प्रवास थांबवित मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी गुरुवारी पक्षाला रामराम ठोकला. राजा यांच्या या निर्णयामुळे मुंबई काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात असून, यामुळे अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

४. गेल्या २५ वर्षांपासून काटोल विधानसभा मतदारसंघात अनिल वसंतराव देशमुख आणि त्यांचे घड्याळ चिन्ह हे समीकरण चांगलेच रुजले आहे. यावेळी अनिल देशमुख यांच्याऐवजी त्यांचे पुत्र सलील निवडणूक रिंगणात ‘तुतारी’ चिन्ह घेऊन उतरले आहेत.

५. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव, उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि विधान परिषद आमदार मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो स्वतः वामन म्हात्रे यांनीच फेसबुकवर शेअर केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

६. ‘ट्रम्प तुम्ही आणि तुमचे समर्थक कचरा आहात,’ या अध्यक्ष जो बायडेन यांच्या शेलक्या टीकेला प्रत्युत्तर देताना माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी विस्कॉन्सिनमध्ये खरोखरीच कचऱ्याच्या गाडीवर उभे राहून प्रचार केला. ‘कमला, यू आर फायर्ड! असे माझे त्यांना प्रत्युत्तर आहे,’ असे ट्रम्प म्हणाले.

७. पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण कमी होता होत नाहीय. शहरातील डीपी रोडवर झालेल्या गोळीबाराला एक दिवस उलटला नाही तोवर येरवडा परिसरात रात्री उशिरा पार्किंगच्या वादातून निवृत्त लष्कर कर्मचाऱ्याने एका तरुणावर गोळीबार केला. त्यात तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना काल रात्री उशिरा येरवडा येथील अशोकनगर परिसरात घडली. बातमी वाचा सविस्तर…

८. आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावाआधी सर्व संघांनी आपली रिटेन्शन यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक मोठे खेळाडू पाहायला मिळत आहेत, ज्यांना फ्रँचायझींंनी रिटेन न करण्याचा निर्णय घेतलाय. यामध्ये पाच कर्णधारांना फ्रँचायझींनी रिलीज करत धक्का दिला आहे.

९. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजेच्या दरम्यान परशुराम गोमा पिरकट (वय ४५) हे ३१ क्रमांकाच्या हातरिक्षामध्ये पर्यटकाला बसवून माथेरानमधील हॉटेलमध्ये आणत होते. वे साईड हॉटेलचा चढ चढून गाडी मेरिटाईम हाऊसजवळ आल्यानंतर पिरकट यास अचानक भोवळ आली आणि तो रिक्षा सोडून जमिनीवर आदळला. बातमी वाचा सविस्तर…

१०. बॉलिवूड अभिनेत्री तसेच विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन आज तिचा ५१ वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या ऐश्वर्याचे वैवाहिक आयुष्य खूपच चर्चेत आहे. तिचा आणि अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेकचा घटस्फोट होण्याच्या मार्गावर आहे असे म्हटले जातेय. अभिषेक सध्या ऐश्वर्यापासून दूरावला असून त्याची दसवी सिनेमातली कोस्टार निम्रत कौरला तो डेट करत असल्याचे म्हटले जातेय.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.