Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

फिर एक बार महायुती सरकार? खुद्द PM मोदी मैदानात, नाशिक सभेची तारीख ठरली

5

PM Modi Nashik Sabha: अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे तपोवनातील मोदी मैदानासह ठक्कर डोम येथील मोकळ्या मैदानात सभा घेण्याबाबतची चाचपणी केली जात आहे.

महाराष्ट्र टाइम्स
PM Modi e

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : लोकसभेपाठोपाठ विधानसभेच्या प्रचारासाठीही पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये येणार असून, दि. ८ नोव्हेंबर रोजी त्यांची जाहीर सभा होणार आहे. जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा घेण्याचे नियोजन सुरू झाले असून, सभास्थळाची चाचपणी केली जात आहे.

अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे तपोवनातील मोदी मैदानासह ठक्कर डोम येथील मोकळ्या मैदानात सभा घेण्याबाबतची चाचपणी केली जात आहे. दरम्यान, भाजपकडून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या सभाही पक्षाकडे मागितल्या आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आटोपल्यानंतर आता माघारीची प्रक्रिया सुरू आहे. दि. ४ नोव्हेंबरला माघारी असून, ५ तारखेपासून खऱ्या अर्थाने निवडणूक रणधुमाळीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडून आताच प्रचाराची व्यूहरचना आखली जात आहे. त्याचाच भाग म्हणून महायुतीकडून नाशिकच्या मैदानात प्रचारासाठी आता पंतप्रधान मोदींनाही उतरवले जाणार आहे. पाच तारखेपासून पंतप्रधान मोदी राज्यात प्रचार सभा घेणार आहेत. मोदींच्या नियोजनानुसार नाशिकमध्ये येत्या ८ नोव्हेंबर रोजी जाहीर सभा घेण्याची तयारी सुरू आहे.

मोदी दि. ८ नोव्हेंबर रोजी धुळे जिल्ह्यात सभा घेणार आहेत. त्यानंतर नाशिकला सायंकाळी त्यांची सभा होणार असून, त्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना पक्षाकडून स्थानिक पदाधिकाऱ्यांना प्राप्त झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान मोदी १२ जानेवारी आणि १५ मार्च असे दोन वेळा नाशिक दौऱ्यावर आले होते. आता विधानसभा निवडणुकीनिमित्त वर्षभरात तिसऱ्यांदा त्यांचा नाशिक दौरा राहणार आहे. भाजपकडून त्यांच्या सभेची तयारी सुरू झाली असून, मैदानाची चाचपणी केली जात आहे. पावसाची शक्यता असल्याने मोदी मैदान, तसेच ठक्कर डोम येथील मोकळ्या मैदानात सभा घेण्याबाबतची चाचपणी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे.
भावजय करणार नणंदेविरोधात प्रचार! मुक्ताईनगर मतदारसंघात लोकसभेची पुनरावृत्ती, रक्षा खडसे कुणाच्या बाजूने?
योगी, गडकरी, फडणवीसांनाही मागणी
भाजपकडून नाशिकमधील उमेदवारांसाठी अन्य नेत्यांच्या सभांचीही मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सभा नाशिकमध्ये घेण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार या तिघांची एकत्रित सभा घेण्याचाही प्रस्ताव प्रदेशाकडे पाठविण्यात आला आहे.
राज्यातील पहिल्या तृतीयपंथी उमेदवार; रावेरमधून लढवणार निवडणूक, कोण आहेत वंचितच्या शमिभा पाटील?
महायुतीच्या उमेदवारांसाठी नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेची तयारी करण्याबाबतचे निर्देश पक्षाकडून प्राप्त झाले आहेत. त्यानुसार मैदानाची निश्चिती केली जात आहे.-प्रशांत जाधव, शहराध्यक्ष, भाजप

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.