Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

जमावाचं भांडण अन् निष्पापाचा घात; कुटुंबानं तरुण मुलगा गमावला, नेमकं घडलं काय?

4

Mumbai Crime News: दिवाळीच्या धामधुमीत मुंबईमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. मुंबईच्या सायन कोळीवाडा परिसरात शुक्रवारी मध्यरात्री २२ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. ध्वनी प्रदुषणावरुन येथील काही तरुणांमध्ये वाद पेटला आणि हा वाद मिटवायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करण्यात आले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : दिवाळीच्या धामधुमीत मुंबईमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. मुंबईच्या सायन कोळीवाडा परिसरात शुक्रवारी मध्यरात्री २२ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. ध्वनी प्रदुषणावरुन येथील काही तरुणांमध्ये वाद पेटला आणि हा वाद मिटवायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करण्यात आले. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. अँटॉप हिल पोलिसांना याप्रकरणी तक्रार दाखल केली असून पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

सायनच्या अँटॉप हिल मधील जय महाराष्ट्र नगरच्या कोकरी आगारमध्ये ही घटना घडली आहे. वृत्तानुसार, येथे काही लोकांनी एकत्र येत मोठ्या आवाजात गाणी लावली होती, ज्यामुळे येथे स्थित आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास होत होता, यामुळे जमावामध्ये वाद पेटला. २२ वर्षीय विवेक गुप्ता याने हा वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी केली होती. परंतु त्याचा हाच प्रयत्न त्याच्या जिव्हारी आला. विवेकने मध्यस्थी केल्याच्या रागातून जमावातील एका व्यक्तीने त्याच्यावर चाकूने सपासप वार केले.
ते आले, नमस्कार केला अन् ऐन दिवाळीत काका पुतण्यासोबत केला रक्तरंजित खेळ
ही थरारक घटना घडताच तेथे उपस्थित सारेच हादरले. घटनेनंतर विवेकला तात्काळ सायन रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. शरीरावर खोलवर जखमा झाल्याने त्यांची प्रकृती बिघडली होती यातच रात्री ३.३० च्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच झोन ४चे पोलीस अधिकारी रुग्णालयात दाखल झाले. तर पोलिसांनी याप्रकरणी ५ जणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे. दरम्यान केवळ वाद मिटवण्याच्या हेतूने मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणाची हत्या झाल्याे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत: कार्तिक आर मोहन देवेंद्र, कार्तिक कुमार देवेंद्र, विक्की मुत्तू देवेंद्र, मिनियप्पन रवी देवेंद्र आणि कार्तिक आर मोगनची पत्नी, अशी माहिती पोलिसांनी दिली. भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.