Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सत्तारुढ झालेल्यांना शरद पवारांकडून पुन्हा चिमटे, कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचीही करुन दिली आठवण

4

Sharad Pawar Criticize NCP Ajit Pawar Leaders: शरद पवार यांचे गोविंदबाग हे निवासस्थान शुक्रवारी गर्दीने फुलून गेल्याचे दिसून आले. शरद पवार बारामती दौऱ्यावर आहेत. त्यांनी शुक्रवारीही पक्षफूटीवर भाष्य करत सत्तेत जाणाऱ्यांना चिमटे काढले.

Lipi

दीपक पडकर, बारामती : दिपावली पाडव्याच्या एक दिवस अगोदरच शुक्रवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे गोविंदबाग हे निवासस्थान गर्दीने फुलून गेल्याचे दिसून आले. शरद पवार बारामती दौऱ्यावर आहेत. त्यांनी शुक्रवारीही पक्षफूटीवर भाष्य करत सत्तेत जाणाऱ्यांना चिमटे काढले. शिरुर-हवेलीचे उमेदवार अशोक पवार व कार्यकर्ते पवारांच्या भेटीसाठी शुक्रवारी आले होते. याशिवाय राज्याच्या अन्य भागातूनही कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, राज्यातील जनतेने गतवेळी आपल्याला ५४ जागा दिल्या. पण सत्तेचा गैरवापर करत हे सरकार स्थापन झाले. एक काळ असा होता की, विकासात महाराष्ट्र क्रमांक एकवर होते. आज ते सहाव्या स्थानी गेले. ज्यांच्या हाती सत्ता दिली त्यांना सत्तेची जाण नाही. जिल्ह्यातील सामान्यांच्या हिताची जपणूक करण्यासाठी आपण त्यांना पदे दिली. कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून ते मंत्री झाले, पण त्याची आठवण आपल्या सहकाऱ्यांना राहिलेलं नाही, या शब्दांत पवार यांनी टोले लगावले.
पन्नास वर्षानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे ‘दोन विठ्ठल’, बारामतीत दोन्ही पवारांचे स्वतंत्र पाडवे होणार
१९८० साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत माझ्या विचाराचे ५८ आमदार निवडून आले होते. कामानिमित्त इंग्लंडला गेलो असता यातील ५२ आमदार सोडून गेले. नंतर झालेल्या निवडणुकीत ५८ पैकी ५२ लोक पराभूत झाले असल्याची आठवण पवार यांनी यावेळी करून दिली. ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे त्यामुळे शिरूर मध्ये अशोक पवार निवडून येतील असा विश्वास शरद पवार त्यांनी व्यक्त केला. साखर कारखानदारी आपण उभी केली, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले, त्यामुळे महाराष्ट्र साखर धंद्यातील महत्त्वाचे राज्य झाले. राज्यात सत्तांतर होणार आहे. सत्ता आल्यानंतर शिरूरचा घोडगंगा साखऱ कारखाना कसा सुरू होत नाही, ते मी बघतो, असेही शरद पवार म्हणाले. शिवाय जो विरोधात आहे, त्याला अडचणीत आणणे अशी सध्याच्या नेत्यांची भूमिका असल्याची टीका त्यांनी अजित पवार यांचे नाव न घेता केली. तुतारी चिन्हाऐवजी ट्रम्पेट असाच उल्लेख होणार असल्याने याचा आपल्याला कोणत्याही प्रकारचा फटका बसणार नाही, असेही शरद पवार म्हणाले.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.