Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

ज्याचा एकही आमदार नाही, तो मुख्यमंत्री कोण होणार सांगतो, सरवणकरांचा टोला, ठाकरेंवर निशाणा

9

Mahim Vidhan Sabha : कौटुंबिक स्नेहसंबंधांमुळे उद्धव ठाकरे गटाचा उमेदवारच माघार घेईल, अशी शक्यताही सदा सरवणकर यांनी बोलून दाखवली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : शिवसेना आमदार सदा सरवणकर माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. मनसेकडून अमित ठाकरे रिंगणात असल्यामुळे सरवणकरांनी माघार घ्यावी, असं मत भाजप नेत्यांनी व्यक्त केलं आहे. परंतु सरवणकरांनी या शक्यता धुडकावून लावल्या. मी वर्षा बंगल्यावर काल गेलो, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट झाली नाही, असं सरवणकर म्हणाले. ज्याचा एकही आमदार नाही, त्याने मुख्यमंत्री कोण होणार हे सांगणं हे किती हास्यास्पद आहे, असा टोलाही सरवणकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला. तर कौटुंबिक स्नेहसंबंधांमुळे उद्धव ठाकरे गटाचा उमेदवारच माघार घेईल, अशी शक्यताही त्यांनी बोलून दाखवली.

काय म्हणाले सदा सरवणकर?

माहीममधून माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही. मला एबी फॉर्म दिला आहे. मी महायुतीचा उमेदवार म्हणून लढणार आहे. आणखी कोणी फॉर्म मागे घेत असेल तर चौकशी करा. मी प्रचार सुरु केला आहे, बैठकीला सुरुवात होणार आहे, दिवाळी असल्यामुळे कोणाच्या दारात जाणं किंवा आपल्या कार्यकर्त्यांना या कामात गुंतवणं हे बरं नाही. त्यामुळे दिवाळीचा एक दिवस आम्ही सोडला, असं सरवणकर म्हणाले.

वर्षावर गेलो, पण शिंदेंसोबत भेट नाही

माझी कुणाशीही विधान परिषदेबाबत चर्चा झाली नाही. मी काल वर्षा निवासस्थानी गेलो, हे सत्य आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत भेट झाली हे असत्य आहे. मी तिथे स्टाफ-कर्मचाऱ्यांशी बोललो, गप्पागोष्टी केल्या. मुंबईतील आमदार असल्यामुळे वर्षावर दिवसातून एक-दोनदा जात असतो. मात्र मुख्यमंत्री आराम करत असल्यामुळे भेट झाली नाही, असं सरवणकर यांनी स्पष्ट केलं.

महायुतीचा धर्म आम्ही पाळणार आहोत, महायुतीचा उमेदवार हा आमचा उमेदवार असल्याचं देवेंद्र फडणवीसच म्हणाले आहेत. या महायुतीत मनसेला वाव नाही, असं फडणवीसांनी सांगितलं आहे. त्यामुळे मीच महायुतीचा उमेदवार असल्याचा पुनरुच्चार सदा सरवणकर यांनी केला.

ज्याचा एकही आमदार नाही…

अमित ठाकरेंबद्दल प्रश्न विचारला असता, सरवणकर म्हणाले, की काही वैयक्तिक मतं असतात, ज्याचा एकही आमदार नाही, त्याने मुख्यमंत्री कोण होणार हे सांगणं हे किती हास्यास्पद आहे. पण मी त्यांच्यावर टिका करावी असं वाटत नाही. मुख्यमंत्री कोण होणार हे महायुती ठरवेल. मी या मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार म्हणून उभा राहणार आहे आणि जनतेच्या आशीर्वादाने निवडून येणार आहे, एवढंच मला कळतं. मी कुठेही एकटा पडलो नाही, जनता माझ्यासोबत आहे, कार्यकर्त्यांची इच्छा आहे, असं सरवणकरांनी स्पष्ट केलं.
Akhil Chitre : राजसाहेबांना फसवलं, सिद्दीकींच्या सल्ल्याने तृप्ती सावंत मनसेच्या तिकिटावर, हा घ्या पुरावा; मनसे नेत्याने फोटोच टाकला
महेश सावंत म्हणाले की जुने शिवसैनिक असल्याने सदा सरवणकर यांनी माघार घेऊ नये. पण त्याचा सल्ला घेण्याइतका मी काही या क्षेत्रात नवखा नाही. त्यांना मार्गदर्शनाची गरज लागली तर त्यांनीच माझ्याकडून सल्ला घ्यावा, असं मतही सरवणकरांनी व्यक्त केलं.

आचारसंहितेची मंडळी राज्यभर फिरत आहेत. त्यांना काही आक्षेपार्ह वाटलं, तर ते कारवाई करतात, कुणाच्या उत्सवात काही आणणं योग्य वाटत नाही, हिंदू सण आपण उत्साहाने साजरे करतो, अशी प्रतिक्रिया मनसेच्या दीपोत्सवावर ठाकरे गटाने आचारसंहिता भंगाची तक्रार केल्याप्रकरणी सरवणकरांनी दिली.
Aditi Tatkare Net Worth : राष्ट्रवादीतील ‘लाडक्या बहिणी’च्या संपत्तीत घसघशीत वाढ, आदिती तटकरेंची मालमत्ता तब्बल ७७२ टक्क्यांनी वाढली

१०० पैकी ८० फोन म्हणतात, माघार घेऊ नका

मला जर दिवशी १०० फोन येत असतील, तर ८० फोन हे सांगायला येतात की माघार घेऊ नका, तुम्ही तळागाळातील कार्यकर्ते आहात. इतर कुणी मागे घेत आहेत का, त्याकडे लक्ष ठेवा. ही निवडणूक एकतर्फी होणार, असा विश्वास सदा सरवणकर यांनी व्यक्त केला.

राज साहेब प्रचंड मोठे नेते आहेत. आम्हाला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. बाळासाहेबांची प्रतिकृती म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. पण त्यांचे किती आमदार आहेत, आपल्याला माहिती आहे. पण त्यांच्या वक्तव्यावर काही बोलणं योग्य वाटत नाही, असंही सरवणकर म्हणाले.

Sada Sarvankar : ज्याचा एकही आमदार नाही, तो मुख्यमंत्री कोण होणार सांगतो, सरवणकरांचा टोला, म्हणतात मी नाही, ठाकरेंचा उमेदवारच माघार घेईल

ठाकरेच माघार घेतील

ज्याने (महेश सावंत) सांगितलं, ते माघार घेणार नाहीत याची काळजी घ्या. कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध येतील मध्ये आणि तिकडून माघार घेतली जाईल, महेश सावंत माघार घेऊ शकतात. कारण नातेसंबंध आड येतील, पण मी माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही. मला फॉर्म आणि आशीर्वाद दिलाय, त्यामुळे मला निवडणूक लढवावीच लागेल, असंही सदा सरवणकर यांनी ठणकावून सांगितलं.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.