Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘लाडक्या बहिणी’च्या संपत्तीत घसघशीत वाढ, आदिती तटकरेंची मालमत्ता तब्बल ७७२ टक्क्यांनी वाढली

8

Aditi Tatkare Wealth : महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ पाहायला मिळाली. त्यांच्या मालमत्तेत तब्बल ७७२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : महाराष्ट्राच्या २७ कॅबिनेट मंत्र्यांपैकी बहुतांश जणांची आर्थिक स्थिती गेल्या पाच वर्षांत माफक प्रमाणात सुधारल्याचे त्यांच्या शपथपत्रांमधून पाहायला मिळाले. मात्र काही जणांच्या मालमत्तेत घसघशीत वाढ झाल्याचे चित्र आहे. याला कारण ठरली या काळात मंत्र्यांनी खरेदी केलेल्या जमिनी आणि सदनिका.

अदिती तटकरेंची संपत्ती ७७२ टक्क्यांनी वाढली

महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ पाहायला मिळाली. त्यांच्या मालमत्तेत तब्बल ७७२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१९ मध्ये ३९ लाख रुपयांवर असलेली त्यांची संपत्ती ३.४ कोटी रुपये इतकी झाली आहे.

२०२०-२१ मध्ये रोहा येथे एक कोटी रुपये किमतीची १२ एकर पेक्षा जास्त शेतजमीन आणि २१ लाख रुपये किमतीचा ७५ हजार ८२७ चौरस फुटांचा बिगरशेती भूखंड संपादन केल्यानंतर आदिती तटकरे यांच्या निव्वळ संपत्तीत वाढ झाली. सुरुवातीला महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद भूषवलेल्या तटकरे नंतर अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यानंतर पुन्हा मंत्री झाल्या.

चव्हाणांच्या संपत्तीत ११७ टक्के वाढ

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची संपत्ती ७ कोटींवरुन ११७ टक्क्यांनी वाढून १५.५ कोटी रुपये इतकी झाली आहे. त्यांच्या संपत्तीमध्ये दीड लाख रुपये किमतीचे रिव्हॉल्व्हरही आहे. क्रीडा, युवक कल्याण आणि बंदरे विकास मंत्री संजय बनसोडे यांची निव्वळ मालमत्ता १४४ टक्क्यांनी वाढून दोन कोटींवरुन पाच कोटी झाली आहे.
Ravi Raja : नऊ दिवस दिल्लीत, भेट दहा मिनिटांची, रवी राजांच्या पक्षांतराचं कारण काँग्रेस नेत्याने सांगितलं
मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या संपत्तीत २२० टक्के वाढ नोंद झाली आहे. राठोडांची संपत्ती ५.९ कोटी रुपयांवरून सुमारे १५.९ कोटींवर गेली आहे. संजय राठोड यांनी २०२३ मध्ये प्रभादेवीत १३ कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी केल्यानंतर त्यांच्या एकूण मालमत्तेत वाढ झाली. तर त्यांच्या पत्नीने डिसेंबर २०१९ मध्ये नागपूरमध्ये ३७ हजार ४५२ चौरस फुटांची व्यावसायिक मालमत्ता ११ कोटी रुपयांना खरेदी केली. परिणामी, त्यांच्या दायित्वांमध्येही लक्षणीय वाढ होऊन ती २.२२ कोटींवरुन २४.४ कोटी रुपयांवर गेली.

Aditi Tatkare Net Worth : राष्ट्रवादीतील ‘लाडक्या बहिणी’च्या संपत्तीत घसघशीत वाढ, आदिती तटकरेंची मालमत्ता तब्बल ७७२ टक्क्यांनी वाढली

महायुतीच्या प्रमुखांची संपत्ती किती वाढली?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निव्वळ मालमत्तेत ६६ टक्के वाढ झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, निव्वळ मालमत्तेत अनुक्रमे ४४ टक्के आणि ५६ टक्के वाढ झाली आहे.
Waman Mhatre : मिलिंद नार्वेकरांच्या भेटीला शिंदेंचा शिलेदार, होमपिचवरच राजकीय डाव, ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर घाव?

ईडीच्या निशाण्यावरील मंत्र्यांची संपत्ती किती?

मनी लाँड्रिंगशी संबंधित प्रकरणात तीन मंत्री अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) चौकशीला सामोरे जात आहेत. राज्य सहकारी बँक प्रकरणात अजित पवार आणि त्यांचे राष्ट्रवादीतील सहकारी हसन मुश्रीफ अडकले होते. तर आरटीओ जमीन आणि महाराष्ट्र सदनाशी संबंधित कथित घोटाळ्यात २०१६ मध्ये अटक झालेले राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ जामिनावर बाहेर आहेत.

हसन मुश्रीफ यांच्या ठिकाण्यांवर ईडीचे छापे पडले आणि त्यांना चौकशीला सामोरे जावे लागले होते, तर अजित पवार यांची या प्रकरणी कधीही चौकशी झाली नाही. या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांमध्ये या प्रकरणांचा थोडक्यात उल्लेख केला आहे. भुजबळांच्या मालमत्तेत १७ टक्के वाढ झाली आहे, तर मुश्रीफ यांची संपत्ती ३४ टक्क्यांनी वाढली आहे.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.