Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

राजपूत वडील, मुस्लीम आई, मारवाडी बालमित्राशी विवाह; शायना यांच्या नावापुढील एनसीचा अर्थ काय?

13

Shaina NC Imported Maal Remark : शायना एनसी यांच्यासंदर्भात अरविंद सावंत यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाची राष्ट्रीय आणि राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.

Shaina NC: राजपूत वडील, मुस्लीम आई, मारवाडी बालमित्राशी विवाह; शायना यांच्या नावापुढील ‘एनसी’चा अर्थ काय?

मुंबई : मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार शायना एन. सी. यांच्याविरोधात शिवसेना (उबाठा) खासदार अरविंद सावंत यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाची राष्ट्रीय आणि राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी सविस्तर अहवाल सादर करावा, असे आदेश दोन्ही आयोगांनी दिले आहेत.

मुंबादेवी मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून अमिन पटेल निवडणूक रिंगणात आहेत. शायना एन. सी. या वरळी विधानसभेसाठी इच्छुक असताना त्यांना महायुतीने मुंबादेवी मतदारसंघातून उमेदवारी दिल्याने अरविंद सावंत यांनी त्यांच्यासंदर्भात वक्तव्य केले होते.

अरविंद सावंत काय म्हणाले होते?

‘त्यांची अवस्था पाहा. त्या आयुष्यभर भाजपात राहिल्या आणि आता शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात गेल्या. पण, इथे इम्पोर्टेड चालत नाही. आमच्या इथे ओरिजनल माल चालतो,’ असे विधान अरविंद सावंत यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे सर्वत्र पडसाद उमटले. त्यानंतर अरविंद सावंत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या की, ‘खासदार अरविंद सावंत यांनी शायना एन. सी. यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य केलेले आहे. राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली असून मुंबई पोलिसांना याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. राजकारणात, समाजकारणात वावरणाऱ्या व्यक्तींनी महिलांबाबत बोलताना भान बाळगणे आवश्यक आहे.’

दुसरीकडे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनीही सावंत यांचे विधान अयोग्य असल्याचे नमूद केले. पोलिस आणि निवडणूक आयोगाने कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शायनांच्या नावापुढील एनसीचा अर्थ काय?

व्यवसायाने फॅशन डिझाईनर असलेल्या ५१ वर्षीय शायना एनसी या मुंबईचे माजी शेरीफ नाना चुडासामा यांच्या कन्या आहेत. ते प्रख्यात व्यावसायिक होते. वडिलांच्या नावाचा शॉर्टफॉर्म करुन त्या आडनावाऐवजी एनसी लावतात.

मलबार हिलमध्ये जन्म

शायना यांचा जन्म मुंबईतील मलबार हिल भागात झाला. नाना चुडासामा यांचं कुटुंब सौराष्ट्र भागातील हिंदू गुजराती राजपूत आहे. शायना यांच्या मातोश्री मुनिरा या दाऊदी बोहरा मुस्लीम कुटुंबातील आहेत. शायाना यांना दोन भावंडं आहेत. भाऊ अक्षय नाना चुडासामा, तर बहीण वृंदा यांचा विवाह मुस्लिम कुटुंबात झाला आहे.
Sada Sarvankar : ज्याचा एकही आमदार नाही, तो मुख्यमंत्री कोण होणार सांगतो, सरवणकरांचा टोला, म्हणतात मी नाही, ठाकरेंचा उमेदवारच माघार घेईल
शायना यांचे शालेय शिक्षण क्वीन मेरी स्कूल, मुंबई मधून १९८९ मध्ये झाले, तर १९९३ मध्ये त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेज येथून राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली. पदवीनंतर त्यांनी न्यूयॉर्क शहरातील फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून फॅशन डिझाइनमध्ये सहयोगी पदवी घेतली.

बालमित्राशी लग्न

शायना यांनी मारवाडी जैन असलेल्या मनीष मुनोत यांच्याशी लग्न केले. दोघे पहिल्यांदा शाळेत भेटले, जेव्हा त्या तेरा वर्षांच्या होत्या. सहा वर्षांच्या डेटिंगनंतर वयाच्या तेविसाव्या वर्षी त्यांनी लग्न केलं.

क्वीन ऑफ ड्रेप्स

शायना एनसी फॅशन इंडस्ट्रीमध्ये ५४ वेगवेगळ्या प्रकारे साडी ड्रेप करण्यासाठी ‘ड्रेपिंगची राणी’ म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी सर्वात वेगवान साडी नेसण्याचा विक्रम रचत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे.
Raj Thackeray : गेम फिरला! महायुतीची अडचण, मनसेची उमेदवारी मागे घेण्याचा मेसेज, राज ठाकरेंच्या भेटीनंतर ‘इंजिन’ यार्डात

राजकारणात दीर्घ प्रवास

शायना यांनी २००४ मध्ये राजकारणात प्रवेश केला. त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेतला. पुढे पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्तेपद, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आणि महाराष्ट्र भाजपचे कोषाध्यक्षपदही भूषवले आहे. आता मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून त्या राजकीय तडजोड म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करुन ‘धनुष्य बाण’ चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.