Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
ST Bus Service: एसटीची हेल्पलाइन बंद असणे, फोन वेळेवर न लागणे, फोन लागला तरी अचूक माहिती न मिळणे यांमुळे एसटीच्या लाडक्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
हायलाइट्स:
- ऐन सणासुदीला हेल्पलाइनच्या अडचणी
- मुख्यालयातून विशेष गाड्यांची घोषणा नाहीच
- बिघडलेल्या वेळापत्रकांमुळे स्थानक-आगारात खोळंबा
एसटी प्रवाशांच्या अडचणी सोडवण्यासाठी १८००-२२-१२५० हा टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक एसटी महामंडळाने जाहीर केला. ई-शिवनेरीसह बहुतांशी गाड्यांमध्ये हा क्रमांक झळकतो. यावर संपर्क साधला असता फोन लागत नाही. फोन लागल्यास योग्य माहिती मिळत नाही. अनेकदा तक्रार-समस्या सांगत असतानाच फोन ठेवला जातो, असे अनुभव एसटी प्रवाशांना येत आहे. एसटीच्या टोल फ्री क्रमांकाचे व्यवस्थापन वाहतूक विभागाकडून केले जाते. एसटी मुख्यालयाच्या चौथ्या मजल्यावर सात ते आठ बीएसएनएल लँडलाइनवरून हा टोल फ्री क्रमांक हाताळला जातो. सुरुवातीला एसटी कर्मचाऱ्यांसह ही यंत्रणा सुरू झाली. एसटी कर्मचाऱ्यांना हाताळणी जमत नसल्याचे सांगत ही यंत्रणा खासगी कर्मचाऱ्यांकडे देण्यात आली. खासगी कर्मचाऱ्यांच्या तक्रारी वाढल्यानंतर आता पुन्हा नाममात्र एसटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. सध्या ही हेल्पलाइन नावापुरती सुरू ठेवण्यात आली आहे, असे एसटीतील सूत्रांनी सांगितले.
दोन दिवस बेस्ट कोलमडणार? कर्मचाऱ्यांकडून दिवाळी रजा घेऊन आगार बंद करण्याचा प्रयत्न
अहिल्यानगर, बीड येथे जाण्यासाठी रेल्वे नसल्याने एसटी हा एकमेव पर्याय आहे. दिवाळी सुट्टीच्या दिवसात मुंबई विभागाकडून यंदा जादा गाड्यांची घोषणा झाली नाही. नियमित विलंबाने येणाऱ्या गाड्यांना प्रचंड गर्दी आहे. हेल्पलाइन बंद असल्याने एसटी गाडी नेमकी केव्हा येईल, याची कोणताही माहिती उपलब्ध होत नाही. एसटी स्थानकातील कँटीन अद्याप खुले झाले नाहीत. पिण्यासाठी मोफत पाणी उपलब्ध नसल्याना विकतचे बाटलीबंद पाणी घेऊन तहान मिटवावी लागत आहे, असे मुंबई सेंट्रल येथील प्रवासी दिनेश मोरे यांनी सांगितले.
दिल्ली झाकोळली! फटाक्यांच्या आतषबाजीने हवेचा दर्जा ‘अत्यंत खराब’, ३ वर्षांतील सर्वाधिक प्रदूषित दिवाळीची नोंद
बहिणींनी प्रवास कसा करायचा?
गेल्या दिवाळीतील भाऊबीजेला महामंडळाने एका दिवसात ३१.६० कोटी रुपयांची कमाई केली होती. एसटीचे रोजचे उत्पन्न सरासरी १८-२० कोटीं रुपये असते. महिला सन्मान योजनेत ५० टक्के सवलतीमुळे एसटीत महिला प्रवाशांची संख्या वाढती आहे. मात्र सण साजरा करण्यासाठी माहेरी जाण्यासाठी एसटी गाड्याच उपलब्ध नाही आणि हेल्पलाइनवरून कोणतीही मदत उपलब्ध होत नसल्याने प्रवास कसा करायचा, असा प्रश्न बहिणींकडून उपस्थित होत आहे.