Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

तिकीट न मिळाल्याने काँग्रेस सोडली, वाजतगाजत पक्षप्रवेश, पाच दिवसात पुन्हा ‘हात’ हाती

4

Anees Ahmed rejoins Congress : चेन्निथला यांच्या उपस्थितीत अनीस अहमद यांनी पुन्हा काँग्रेसचा ‘हात’ हाती धरला. त्यांनी उमेदवारीसाठी वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश केला होता.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : सर्वात कमी काळात पक्षात झालेली घरवापसी म्हणून कदाचित इतिहासात याची नोंद होईल. वर्षानुवर्ष काँग्रेसमध्ये अनेकानेक पदं भूषवणारे माजी मंत्री अनिस अहमद यांनी अवघ्या पाच दिवसात पक्षात पुनरागमन केलं आहे. चेन्निथला यांच्या उपस्थितीत त्यांनी पुन्हा काँग्रेसचा ‘हात’ हाती धरला. त्यांनी उमेदवारीसाठी वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश केला होता.

नागपूर शहरातील मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून तिकीट न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या अनिस अहमद यांनी २८ ऑक्टोबर रोजी डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता.

दोन मिनिटांनी घात झाला

अनीस अहमद मध्य नागपूर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे इथे तिरंगी लढत अपेक्षित होती. मात्र अवघी दोन मिनिटं उशीर झाल्याने अनिस अहमद यांना आपला उमेदवारी अर्ज दाखल करता आला नव्हता.
Raj Thackeray : गेम फिरला! महायुतीची अडचण, मनसेची उमेदवारी मागे घेण्याचा मेसेज, राज ठाकरेंच्या भेटीनंतर ‘इंजिन’ यार्डात
नागपुरातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर पाच तास ते तिष्ठत थांबले होते, रात्री आठ वाजल्यानंतर अनिस अहमद बाहेर आले आणि त्यांनी आपल्यासोबत घडलेला प्रकार जड अंतःकरणाने सांगितला.

Anees Ahmed : सर्वात जलद घरवापसी! तिकीट न मिळाल्याने काँग्रेस सोडली, वाजतगाजत पक्षप्रवेश, पाच दिवसात पुन्हा ‘हात’ हाती

तिरंगी लढत नाहीच

मध्य नागपूरच्या जागेवर महायुतीतर्फे भाजपकडून प्रवीण दटके आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे बंटी शेळके यांच्यात थेट लढत होणार आहे. अनिस अहमद यांचा निवडणूक रिंगणात प्रवेश झाल्याने उत्सुकता वाढली होती, परंतु आता थेट दोन उमेदवारांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. अनीस अहमद यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र ते उमेदवारी दाखल करु शकले नाहीत. अखेर त्यांनी पक्षात पुनरागमन केले आहे.
Arvind Sawant : मातोश्रीवरुन मेसेज, अरविंद सावंतांनी ‘माल’ संदर्भातील वाद तातडीने संपवला, पीसी संपताच ताडकन उठले

मुस्लिम समाजावर अन्याय केल्याचा आरोप

मध्य नागपूरच्या जागेवर मुस्लिम उमेदवार न दिल्याबद्दलही अहमद यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यांच्या मते या जागेवर निर्णायक भूमिका बजावणाऱ्या मुस्लिम समाजाचा उमेदवार न दिल्यामुळे काँग्रेस पक्षाने समाजावर अन्याय केला होता. मंगळवारी अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले मात्र चर्चा बहुतांशी अनिस अहमद यांच्या उमेदवारीचीच राहिली होती.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.