Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Sharad Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, शरद पवारांचा महायुती सरकारवर सर्वात गंभीर आरोप, काय म्हणाले?

9

राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून टाकणारी बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महायुती सरकारवर शरद पवार यांनी गंभीर आरोप केला आहे. यावर फडणवीस काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप केला आहे. दिवाळीच्या पाडव्याला शरद पवारांनी राज्यभरातून येणाऱ्या आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. गोविंदबागेमध्ये शरद पवार समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळाली. पाडव्यातील या भेटीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पवारांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं, मात्र त्यामध्ये एक सर्वात मोठा आणि तितकाच गंभीर आरोप केला आहे.

अनेक गोष्टी होत आहेत पण या सरकारचं हेच वैशिष्ट आहे. विमानातून एबी फॉर्म दिले गेल्याचं तुम्ही वर्तमानपत्रात छापलंत. आम्ही अनेक जिल्ह्यामधील काही अधिकाऱ्यांकडून ऐकलं की सत्ताधारी पक्षातील उमेदवारांना अर्थसहाय्य करण्याचं काम केलं जात आहे. निवडणुकीमध्ये पोलीस दलाच्या गाड्यांमधून रसद पाठवली जात असल्याचं त्या विभागाच्या काही अधिकाऱ्यांकडून ऐकायला मिळालं. खरं तर यावर मला जाहीरपणे अधिक बोलायची इच्छा होती. परंतु त्या अधिकाऱ्यांनी आमची नाव समोर येणार नाहीत अशी कमिटमेंट घेतली होतीा. त्यांचे भवितव्य संकटात येऊ नये म्हणून मी अधिक बोलत नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. माझ्याकडे याबाबत अधिकृत माहिती नाही त्यामुळे मी यावर भाष्य करत नसल्याचंही शरद पवार म्हणाले.

रश्मी शुक्लांच्या राजीनाम्याच्या मागणीवर पवार काय म्हणाले?

माझ्या करियरची सुरूवातीला मी गृहखात्याचा राज्यमंत्री होतो, गृहमंत्री त्यानंतर चारवेळेला मुख्यमंत्री असताना गृहखातं माझ्याकडे होतं. मला गृहखात्याविषयी व्यवस्थित माहिती आहे. पोलीस दलाचे अधिकारी महाराष्ट्राचे वैशिष्ट्य होतं. अनेक कर्तबगार विश्वास देणारे अधिकारी महाराष्ट्राने पाहिले आहेत. महाराष्ट्रात पहिल्यांदा राज्याच्या प्रमुखाबद्दल अशा प्रकारची मागणी करत आहेत अशी परिस्थिती कधी झाली नव्हती. ज्या व्यक्तिबद्दल हे भाष्य केलं जात आहे त्यांनी काय काय उद्योग केले आहेत, फोन टॅपिंग आणखीन काय याच्या अने चर्चा झाल्या. राज्य सरकारने त्याची सखोल चौकशी करून सत्य काय आहे शोधून काढणं त्यांची जबाबदारी होती. मात्र सरकारने त्यांना बढती दिल्याचं सांगत शरद पवारांनी रश्मी शुक्ला यांच्यासह सरकारवर टीका केली.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.