Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Nandurbar Bollero Accident: नंदुरबारमध्ये झालेल्या भीषण अपघातात पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. पोलिसांनी या प्रकरणात तिघांना अटक केली आहे.
नंदुरबार ते धानोरा रस्त्यावर लोय पिंपळोद गावापासून एक किमी अंतरावर नंदुरबारकडून धानोराकडे भरधाव वेगात जाणारी बोलेरो ( जी. जे. ०२, झेड. झेड. ०८७७) यावरील चालकाने २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजे दरम्यान रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन मोटरसायकलसह नागरिकांना चिरडले. या भीषण अपघातात योगेश कालूसिंग नाईक (४०, रा. पिंपळोद, ता. नंदुरबार), राहुल धर्मेंद्र वळवी (२६ रा. पिंपळोद, ता. नंदुरबार), अनिल सेन्या मोरे (२४, रा. शिंदे, ता. नंदुरबार), चेतन सुनील नाईक (१२ रा. भवाली, ता. नंदुरबार), श्रीकृष्ण लालसिंग ठाकरे (४०, रा. पिंपळोद, ता. नंदुरबार) यांचा मृत्यू झाला आहे.
Rajsthan Crime: बंद कारमध्ये दोघांची बॉडी, पत्नी मागच्या तर पती समोरच्या सीटवर, धडकी भरवणारी घटना
तर कृष्णा रामदास भिल (रा. शिंदे, ता. नंदुरबार) यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर तिन्ही मोटरसायकलचा चक्काचूर झाला आहे. तर बोलेरो गाडीही उलटली होती. गावकऱ्यांच्या मदतीने तिला सरळ करण्यात आलं. याप्रकरणी गणेश कालूसिंग वळवी (रा. पिंपळोद, ता. नंदुरबार) यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार येथील उपनगर पोलीस ठाण्यात वाहन चालकाविरुद्ध भा. न्या. संहिता कलम १०५, २८१, ३२४(५) सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पो. नि. अमितकुमार मनेळ करीत आहेत.
Nandurbar Accident: रस्त्याच्या कडेला उभ्या ६ जणांना बोलेरोने उडवलं, ५ जणांच अंत; तिघांना अटक, नातेवाईकांचा आक्रोश
संतप्त नातेवाईकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या
नंदुरबार तालुक्यातील पिंपळोद गावाजवळ भीषण अपघातात ५ जणांच्या मृत्यू प्रकरणी संतप्त नातेवाईकांनी उपनगर पोलीस गाठत ठिय्या देत आक्रोश केला. सदर वाहन हे गुजरात राज्यातील उकाई लीस प्रोजेक्ट नामक कंपनीचे असून कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी मागणी केली. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह घेणार नाही असा पवित्र घेतला आहे. पोलिसांनी याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तिघांना अटक केल्याचे सांगितले. मात्र मृतांचे नातेवाईक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे पोलीस ठाणे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.