Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पालघरमध्ये चाललंय काय? वनगानंतर महायुतीचा आणखी एक नेता नॉट रिचेबल, २४ तासांपासून संपर्क होईना

8

Palghar Amit Ghoda MIssing: श्रीनिवास वनगा यांच्यानंतर आता पालघरमधील आणखी एक नेता नॉट रिचेबल असल्याचं समोर येत आहे. भाजपमधून बंडखोरी करत अमित घोडा हे गेल्या २४ तासांपासून संपर्काच्या बाहेर आहेत.

Lipi

पालघर: विधानसभा निवडणुकीच्या धामधुकीत राज्यात मोठ्या हालचाली घडत आहेत. पालघर येथे काहीच दिवसांपूर्वी शिंदे गटाकडून उमेदवारी न मिळाल्याने व्यधित झालेले श्रीनिवास वनगा हे बेपत्ता झाले होते. त्यानंतर जवळपास ३६ तासांनी ते घरी परतले. तर आता, पालघर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले अमित घोडा हे गेल्या २४ तासांपासून नॉट रिचेबल असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अमित घोडा यांनी भाजपमधून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता.

पालघर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे अमित घोडा यांनी शिवसेना शिंदे गटाविरोधात बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले अमित घोडा हे आता नॉट रिचेबल झाले आहेत. अमित घोडा यांनी भाजपमधून बंडखोरी करत पालघर विधानसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, आता अमित घोडा नॉट रिचेबल झाले आहेत.
शिवसेनेतील बंडोबा नॉट रिचेबल, वनगांनंतर ‘या’ नेत्यामुळे शिंदेंची डोकेदुखी वाढणार
पालघर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाने माजी खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, पालघर विधानसभा मतदारसंघात भाजप शिवसेना शिंदे गट महायुतीत आलबेल नसल्याचे दिसून आले आहे. भारतीय जनता पक्षाचे डहाणू विधानसभा प्रमुख अमित घोडा यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या विरोधात बंडखोरी केली आहे. शिंदे गटाविरोधात बंडखोरी करत भाजपचे अमित घोडा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Amit Ghoda Not Reachable: पालघरमध्ये चाललंय काय? वनगानंतर महायुतीचा आणखी एक नेता नॉट रिचेबल, २४ तासांपासून संपर्क होईना

मात्र, बंडखोरी केलेले अमित घोडा हे कोणाच्याही संपर्कात नाहीत. चोवीस तासाहून अधिक कालावधी उलटला तरीही कोणाशीही त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही. नॉट रिचेबल होण्यापूर्वी अमित घोडा यांनी बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतल्याची माहिती देखील समोर आली आहे. पालघर विधानसभा मतदारसंघातून अमित घोडा यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी वरिष्ठांकडून त्यांची समजूत काढण्यासाठी फोन करण्यात येत आहेत. मात्र, घोडा नॉटरिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. ते गेल्या २४ तासांपासून नॉटरिचेबल आहेत.

नुपूर उप्पल

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.