Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Daily Top 10 Headlines in Marathi; रोजच्या ताज्या ठळक बातम्या: सकाळच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सचा थोडक्यात आढावा, पुढील लिंकवर क्लिक करुन वाचा सविस्तर बातमी
२. विधानसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेण्यासाठी आता एक दिवस बाकी आहे. त्याआधी राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याने महायुती आणि महाविकास आघाडीमधील नेते बंडखोरांची नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. मात्र काही जागांवर बंडखोरी करत निवडणूक लढण्यावर उमेदवार ठाम आहेत.
३. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवणासाठी अनेकजण पक्षातील नेत्यांकडे मोर्चेबांधणी करतात. तिकीट न मिळाल्यास बंड पुकारून निवडणूकीच्या रिंगणात उतरताना आपल्याला पहायला मिळतो. नांदेड जिल्हात सध्या वेगळ्याच घडामोडी पहायला मिळत आहे. उमेदवारी मिळूनही एका विद्यमान आमदाराने आपल्या पत्नीसाठी निवडणुकीतून माघार घेतली आहे.
४. अभिनेता शशांक केतकर नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. त्यांनी वेगवेगळ्या मालिका, चित्रपट आणि नाटकांमधून प्रेक्षकांची मन जिंकून घेतली आहे. तो अनेक सामाजिक मुद्द्यांवर आपले परखड मत मांडत असतो. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक वेगवेगळ्या गोष्टी शशांक आपल्या चाहत्यांशी शेअर करायला विसरत नाही. बातमी वाचा सविस्तर…
५. ”भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी दापोली विधानसभा मतदारसंघात आम्ही योगेश कदम यांचे काम करणार नाही. शिवसेनेचे उमेदवार म्हणून आम्हाला ते मान्यच नाही”, अशा स्वरूपाची भूमिका काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन मांडली होती. त्यामुळे राज्यात जरी युती असली तरी या मतदारसंघात स्थानिक भाजप आणि शिवसेना यांच्यामधील वाद चव्हाट्यावर आले होते.
६. विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. तर ४ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख आहे. त्यामुळे सध्या पक्षातील वरिष्ठ नेते बंडखोरांची मनधरणी करत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यातच मुंबईच्या माहीम मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा होत आहे.
७. तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया क्रेडिट कार्ड (एसबीआय कार्ड) वापरत असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. आता वीज, गॅस, पाणी यांसारखी युटिलिटी बिले भरण्यासाठी एसबीआय क्रेडिट कार्ड वापरताना तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने १ नोव्हेंबरपासून आपल्या क्रेडिट कार्डमध्ये अनेक बदल लागू केले आहेत.
८. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणनने ८सप्टेंबर रोजी मुलीला जन्म दिला. तेव्हापासून तिचे चाहते तिच्या व तिच्या लेकीची एका झलकेसाठी उत्सुक होते. अखेर दिवाळीच्या दिवशी ही प्रतिक्षा संपली अन् तिने आपल्या नवजात मुलीचा पहिला फोटो शेअर केला. हा फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला. बातमी वाचा सविस्तर…
९. या वर्षी अनेक आयपीओ बाजारात आले आहेत. एकापाठोपाठ एक अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या शेअर बाजारात उतरल्या आहेत. यापैकी बहुतेकांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. आता दिवाळीच्या थोड्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आयपीओ मार्केटमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत.
१०. पाकिस्तानातील प्रसिद्ध चित्रपट आणि थिएटर अभिनेत्रीने आपल्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, तिच्या पतीने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आणि तिला बेदम मारहाण केली. संपत्तीसाठी मारहाण केल्याचं अभिनेत्रीने सांगितलं. नर्गिस उर्फ गजाला इद्रिस असं या अभिनेत्रीचं नाव आहे. या घटनेची माहिती शुक्रवारी देण्यात आली. बातमी वाचा सविस्तर…