Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

श्रीजया चव्हाणांविरोधात २४ उमेदवार रिंगणात; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ११५ उमेदवारांची मनधरणी करण्यात यश

12

Bhokar Assembly Constituency : भोकर मतदारसंघात अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ११५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी या मतदारसंघात अशोक चव्हाण तळ ठोकून बसले होते.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अर्जुन राठोड, नांदेड : जिल्ह्यातील हायव्होल्टेज मतदारसंघ असलेल्या भोकर मतदारसंघात आता २४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक राहिले आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत १४० पैकी तब्बल ११५ उमेदवारांनी माघार घेतली आहे. आता मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण आणि कॉग्रेस उमेदवार पप्पू पाटील कोंडेकर यांच्यात मुख्य लढत होणार आहे.
Ashok Chavan : भाजपच्या त्रासामुळे नाही, तर काँग्रेसच्या जाचामुळेच मी पक्ष बदलला! अशोक चव्हाण यांचा जाहीर सभेत गोप्यस्फोट
नऊ विधानसभेसाठी एकूण ४५८ उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता, त्यापैकी २९६ जणांनी आपला अर्ज मागे घेतल्याने नऊ मतदार संघात १६५ उमेदवार रिंगणात आहेत. दुसरीकडे लोकसभा पोट निवडणुकीत ३९ पैकी २० जणांनी माघार घेतली आहे. आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भोकर मतदारसंघात अशोक चव्हाण तळ ठोकून बसले होते.
भोकरमधून अर्ज भरणाऱ्या अशोक चव्हाणांची कन्या श्रीजया यांची संपत्ती किती? शपथपत्रांमधून माहिती समोर
भोकर मतदारसंघ हा चव्हाण कुटुंबियांचा परंपरागत मतदार संघ आहे. स्व. शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण आणि अमिता चव्हाण यांनी या मतदारसंघातून नेतृत्व केलं आहे. आता चव्हाण कुटुंबियाची तिसरी पिढी म्हणजेच श्रीजया चव्हाण या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. भाजपकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दुसरीकडे काँग्रेसने पक्षातील युवा कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या तिरुपती पाटील कोंडेकर यांना मैदानात उतरवले आहे. राज्याच लक्ष लागलेल्या या मतदारसंघात एकूण १४० उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता. अर्ज मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी १७ जणांनी माघार घेतली होती. त्यानंतर आज शेवटच्या दिवशी किती उमेदवार माघार घेणार याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं. अखेर शेवटच्या दिवशी तब्बल ९८ जणांनी माघार घेतली आहे. निवडणुकीच्या रिंगणात २४ उमेदवार असले तरी मुख्य लढत काँग्रेस आणि भाजपात होणार आहे.
Nandurbar News : बाळासाहेब थोरात हेलिकॉप्टरने नंदुरबार शहरात, दोन तासात महाआघाडीच्या बंडखोरांचे अर्ज मागे
दरम्यान आपल्या कन्येला निवडून आणण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दुसरीकडे लोकसभा पोटनिवडणुकीत ३९ पैकी २० जणांनी माघार घेतल्याने १९ उमेदवार रिंगणात आहेत. एकंदरीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे.
कोण आहेत मंगेश कुडाळकर? प्रचार सभेत भोजपुरी गाण्यावर डान्स, मुख्यमंत्री शिंदे विरोधकांच्या निशाण्यावर

नऊ मतदारसंघात ४५८ पैकी २९६ जणांची माघार

नांदेडमध्ये नऊ मतदारसंघाचा समावेश येतो. या नऊ मतदारसंघात ४५८ जणांनी आपली उमेदवारी दाखल केली होती. सर्वाधिक उमेदवारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघात दाखल करण्यात आली होती. आज अर्ज मागे घेणाच्या शेवटच्या दिवसापर्यंत ११५ जणांनी आपली माघार घेतली. त्यामुळे या हायव्होल्टेज मतदारसंघात आता केवळ २५ उमेदवार रिंगणात राहिले आहे.

श्रीजया चव्हाणांविरोधात २४ उमेदवार रिंगणात; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ११५ उमेदवारांची मनधरणी करण्यात यश

शिवाय किनवट मतदार संघात २९ पैकी १७, हदगांव ६३ पैकी २४, नांदेड उत्तर ७२ पैकी ३३, नांदेड दक्षिण ५१ पैकी २०, लोहा ३३ पैकी १४, नायगाव २६ पैकी १०, देगलूर २७ पैकी ११, मुखेड १७ पैकी ११ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. १६ पेक्षा अधिक उमेदवार असलेल्या मतदार संघात २ इव्हीएम मशीन असणार आहेत.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.