Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

लाडाची बहीण वाट बघत राहिली, भाऊबीजेला येतानाच दादावर काळाचा घाला, रस्त्यातच भावाने जीव सोडला

6

Bhaubeej Brother Death : निलकंठ याला सख्खी बहीण नाही. त्याला चुलत बहीण ओवाळणी करत असते. भाऊबीजेला तो कुठेही असला तरी ओवाळणीसाठी तो गावाकडे येत असे

Lipi

निलेश झाडे, चंद्रपूर : भाऊबीजेचा सण हा बहीण-भावाच्या नात्याला वेगळी झळाळी देणारा दिवस. भाऊ ओवाळणीसाठी येत असल्यामुळे बहीण आतुरतेने आपल्या लाडक्या बंधूरायाची वाट बघत बसली. मात्र नियतीच्या मनात काही भलतंच होतं. बहिणीचा चेहरा बघण्याच्या आधीच काळाने भावासोबत डाव साधला. बहिणीकडे जात असतानान वाटेतच भावाचा भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याने शेवटचा श्वास घेतला. ऐन दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशीच भावाच्या प्रेमाला बहीण पोरकी झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

ही दुदैवी घटना चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यात घडली आहे. अक्षय निलकंठ वाढई (वय २५ वर्ष) असं मृतक भावाचे नाव आहे. तो वरोरा तालुक्यातील डोंगरगाव येथून चेक आष्टा गावाकडे येत होता. यावेळी वाटेत काळाने त्याच्यावर घाला घातला.

कसा झाला अपघात?

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा येथील अक्षय निलकंठ वाढई हा वरोरा तालुक्यात येणाऱ्या डोंगरगाव येथे खाजगी कंपनीत काम करत होता. भाऊबीजेच्या निमित्ताने तो चेक आष्टा गावाकडे दुचाकीने निघाला होता. डोंगर हळदी गावानजीक असलेल्या वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्याचा अपघात झाला.
Bihar Crime : वहिनीसोबत रात्री घालवल्या, पण दुसऱ्याच तरुणीसोबत दोनाचे चार हात; पोलीस हवालदारासोबत घडलं भयंकर
या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी पोंभूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Chandrapur Accident : लाडाची बहीण वाट बघत राहिली, भाऊबीजेला येतानाच दादावर काळाचा घाला, रस्त्यातच भावाने जीव सोडला

लाडाच्या बहिणीवर शोककळा पसरली

निलकंठ याला सख्खी बहीण नाही. त्याला चुलत बहीण ओवाळणी करत असते. भाऊबीजेला तो कुठेही असला तरी ओवाळणीसाठी तो गावाकडे येत असे. मात्र यावेळी ओवाळणी व्हायच्या आधी त्याने जीव सोडला. या घटनेने कुटुंबासह मित्र परिवार आणि शेजाऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Notes found on road : अलिबागमध्ये ‘पैशाचा पाऊस’, गोंधळपाडा रस्त्यावर पाचशेच्या नोटा, नागरिकांनी हातोहात उडवल्या, अखेर…
त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा आप्त परिवार आहे. पुढील तपास पोंभूर्णा येथील पोलिस उपनिरीक्षक धनराज सेलोकर यांच्या मार्गदर्शनाखाली नागोराव नैताम, नरेश निमगडे करीत आहेत. भाऊबीजेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.