Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आधीच निर्णय घ्यायचा होता, मला तोंडघशी का पाडलं? मधुरिमाराजेंची माघार, बंटी पाटलांचा संताप

11

Satej Patil angry on Chhatrapati Shahu Maharaj : निवडणूक लढवायची नव्हती, तर आधी सांगायचं होतं, मीही माझी ताकद दाखवली असती, असंही सतेज पाटील म्हणाले.

Satej Patil : आधीच निर्णय घ्यायचा होता, मला तोंडघशी का पाडलं? हे चुकीचंय महाराज, मधुरिमाराजेंची माघार, बंटी पाटलांचा संताप

नयन यादवाड, कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी माघार घेतली. त्यामुळे काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा संताप पाहायला मिळाला. महाराज, तुम्ही हे बरोबर केलं नाहीत, मी तोंडघशी पडलो, अशा शब्दात बंटी पाटलांनी कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्यासमोर चीड व्यक्त केली. निवडणूक लढवायची नव्हती, तर आधी सांगायचं होतं, मीही माझी ताकद दाखवली असती, असंही सतेज पाटील म्हणाले.

सतेज पाटील काय म्हणाले?

हे पूर्णपणे माझी फसवणूक केल्यासारखं आहे. हे नाही चालणार. आधीच निर्णय घ्यायचा होता नाही म्हणून, आम्हाला काय अडचण होती? आधीच निर्णय घ्यायचा होता ना, नाही म्हणून. हे चुकीचं आहे महाराज. हे काय बरोबर नाही, हे मला मान्य नाही. मला तोंडघशी पाडायची काय गरज होती? असं सतेज पाटील खासदार छत्रपती शाहू महाराज यांना म्हणाले.
Sada Sarvankar : मोठे निर्णय घेताना एखादा बळी जातो, सदा सरवणकर यांचे माहीममधून माघारीचे संकेत
त्यानंतर केबिनबाहेर येऊन सतेज पाटील यांनी पुन्हा राग व्यक्त केला. हे बरोबर नाही हा. अजिबात बरोबर नाही, लक्षात ठेवा. तुम्ही जेवढ्यांनी आग लावली ना, तेवढ्या सगळ्यांना सांगतो, असं म्हणून सतेज पाटील तडक निघून गेले. खाली गेल्यावर पुन्हा ते “उभं राहायचं नव्हत ना… मी पण दाखवली असती माझी ताकद” असं म्हणत गाडीत बसून निघून गेले.
Sada Sarvankar : सदा माझा लढवय्या शिवसैनिक आहेस तू, राजपुत्रासाठी शिवधनुष्य खाली ठेवू नकोस, सरवणकरांसाठी सेनाभवनासमोर बॅनरबाजी

शेवटच्या क्षणी उमेदवारी, शेवटच्या क्षणी माघार

कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून महाविकास आघाडीने काँग्रेसतर्फे राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली होती. कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसची उमेदवारी बदलण्यासाठी प्रयत्न झाले. नाराज इच्छुकांनी खासदार शाहू महाराज, आमदार सतेज पाटील यांच्याकडे उमेदवारी बदलण्यासाठी आग्रह धरला. दिवसभर या संदर्भात हालचाली झाल्या. अखेर ती बदलून मधुरिमा राजे छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या रात्री आठ वाजता मधुरिमा राजे यांना उमेदवारी देण्याचे ठरले. त्यांनी शेवटच्या दिवशी आपला अर्ज भरला. अखेर अर्ज मागे घेण्यास काही मिनिटांचा अवधी असतानाच त्यांनी माघारही घेतली.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.