Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

भाजपनं समजावलं, विमान पाठवलं; तरीही फडणवीस समर्थकाची बंडखोरी कायम, विखेंचं टेन्शन वाढलं

9

Maharashtra Election: विधानसभा निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेले अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. अर्ज माघारी घेण्याची मुदत आज दुपारी ३ वाजता संपली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नगर: विधानसभा निवडणुकीसाठी भरण्यात आलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. काही बंडखोरींची समजूत काढण्यात त्यांच्या पक्षांच्या नेत्यांना यश आलं. तर काहींची बंडखोरी कायम आहे. शिर्डीत हीच परिस्थिती आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार राजेंद्र पिपाडा यांनी माघार घेतलेली नाही. ते निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर अखेरपर्यंत ठाम राहिले आहेत. त्यामुळे शिर्डी विधानसभा मतदारसंघात आता तिरंगी लढत होणार आहे.

शिर्डीतून भाजपनं राधाकृष्ण विखे पाटील यांना पुन्हा संधी दिली आहे. १९९५ पासून ते सलग सहावेळा शिर्डीतून विजयी झालेले आहेत. या कालावधीत त्यांनी तीनदा पक्ष बदलला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या विखेंविरोधात भाजपमधूनच बंडखोरी झाली. राजेंद्र पिपाडा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरण्यासाठी बैलगाडीतून जाणाऱ्या पिपाडा यांची समजूत काढण्यासाठी भाजपनं बरेच प्रयत्न केले. पण ते फोल ठरले.
बंडखोर ठाम, म्हणून अधिकृत उमेदवाराचीच माघार; मविआला कोल्हापुरात मोठा धक्का
राजेंद्र पिपाडा यांना भाजपनं तातडीच्या बैठकीसाठी मुंबईला बोलावलं होतं. त्यांच्यासाठी मुंबईतून खास चार्टर्ड फ्लाईट पाठवलं होतं. चार दिवसांपूर्वी पिपाडा यांना नेण्यासाठी विमान उतरलं होतं. पिपाडा चार्टर्ड फ्लाईटनं सपत्नीक मुंबईला गेले. त्याआधी त्यांनी विमानतळावर चार्टर्ड प्लेनसोबत फोटोही काढले. पक्षानं बरीच समजूत काढूनही पिपाडा निवडणूक लढण्यावर ठाम राहिले. त्यामुळे आता शिर्डीत तिरंगी लढत होईल.
…तर अमित ठाकरे विजयी होण्याची शक्यता अधिक; सरवणकरांनी बसल्या बसल्या मांडलं वेगळंच गणित
राजेंद्र पिपाडा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कट्टर समर्थक मानले जातात. ते सातत्यानं फडणवीसांच्या संपर्कात असतात. पण त्यांचं आणि विखे पाटलांचे सूर कधीही जुळलेले नाहीत. दोघांमधील विळ्या-भोपळ्याचं नातं जिल्ह्याला माहीत आहे. गेल्या काही दिवसांपासून पिपाडा यांची काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी जवळीक वाढली.

Maharashtra Election: भाजपनं समजावलं, विमान पाठवलं; तरीही फडणवीस समर्थकाची बंडखोरी कायम, विखेंचं टेन्शन वाढलं

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उमेदवारीला पिपाडा यांचा ठाम विरोध होता. त्यासाठी त्यांनी थेट पक्षश्रेष्ठींकडे पत्रव्यवहार केले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यानंतर पिपाडा यांनी मतदारसंघातील जनसंपर्क वाढवला. गावभेटी सुरु केल्या. महाविकास आघाडीनं शिर्डीतून प्रभावती घोगरेंना तिकीट दिलं आहे. त्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.