Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

देवाभाऊ, मुंब्र्यात शिवरायांचं मंदिर बांधणं कठीण वाटतंय, मग..; ठाकरेंचा हल्ला, शिंदेंना टोला

10

Uddhav Thackeray: राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर प्रत्येक जिल्ह्यात उभारणार याचा पुनरुच्चार शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी केला आहे

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर प्रत्येक जिल्ह्यात उभारणार याचा पुनरुच्चार शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी केला आहे. आधी मुंब्र्यात शिवरायांचं मंदिर बांधून दाखवा, असं आव्हान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना दिलं होतं. त्या आव्हानाला ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या बीकेसीतील सभेतून प्रत्त्युत्तर दिलं. यावेळी मंचावर काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस शपचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते.

‘शिवाजी महाराजांचं नाव काढल्यानंतर यांच्या अंगाची लाहीलाही होते. शिवरायांची मंदिरं जिल्ह्याजिल्ह्यात बांधणार म्हटल्यावर देवाभाऊ बोलले, त्यांनी मला आव्हान दिलं, तुमच्यात हिंमत असेल तर मुंब्र्यात शिवाजी महाराजांचं मंदिर बांधून दाखवा. अहो देवाभाऊ, जाऊ तिथे खाऊ, आधी मुंब्र्यात जा आणि तिथल्या प्रवेशद्वारावर शिल्प आहे ना ते पाहा. शिवाजी महाराज तिकडे आहेत, जिजाऊ आहेत, तुकाराम महाराज आहेत, सावित्रीबाई फुले आहेत. हे सगळं तिथे आहे. एकदा जाऊन बघा,’ असं प्रत्युत्तर ठाकरेंनी दिलं.
लाडकी बहिणला मविआकडून महालक्ष्मीनं उत्तर; दर महिन्याला किती पैसे मिळणार? ५ गॅरंटीही जाहीर
फडणवीस यांनी दिलेल्या आव्हानावर बोलताना ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही समाचार घेतला. ‘मुंब्रा ठाणे जिल्ह्यात येतो. ज्या जिल्ह्यातून तुम्ही आमच्यातला गद्दार फोडलात आणि मुख्यमंत्री म्हणून डोक्यावर बसलात, त्याच्या जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणं अवघड वाटत असेल तर त्या गद्दाराला डोक्यावर घेतलात कशाला? त्याला डोक्यावर घेऊन नाचलात कशाला?,’ असे सवाल ठाकरेंनी फडणवीस यांना विचारले.
पुढील ३६ तासांच्या आत..; घड्याळ चिन्हावरुन अजितदादा गटाला ‘सर्वोच्च’ आदेश; कोर्टात काय घडलं?
गेल्या महिन्याभरात अदानींसाठी सरकारनं अनेक जीआर काढले. मुंबईतील बरीच जमीन त्यांच्या घशात घातली. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर सरकारनं अदानीच्या फायद्यासाठी काढलेले सगळे टेंडर आम्ही रद्द करणार आहोत. धारावीचा मुद्दा आपल्या वचननाम्यामध्ये असणार आहे, असं ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray: देवाभाऊ, मुंब्र्यात शिवरायांचं मंदिर बांधणं कठीण वाटतंय, मग..; ठाकरेंचा हल्ला, शिंदेंना टोला

मुंबईकर जनता जागरुक आहे. लोकसभा निवडणुकीत तिनं महाविकास आघाडीच्या बाजूनं कौल दिला. सहापैकी पाच जागा आपण जिंकलो. त्यातील एक जागा चोरी करुन ते जिंकले. त्याच्यानंतर झालेली पदवीधर आपण जिंकलो, शिक्षक आमदारकीची जागा आपण जिंकलो, सिनेट जिंकलो. मुंबईकरांचे आशीर्वाद असेच आमच्यासोबत राहतील असा विश्वास ठाकरेंनी व्यक्त केला.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.