Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
दोन वेळा मुख्यमंत्री पद भोगलं, तरी काँग्रेसला शिव्या; ‘अशोक चव्हाणांचा सातबारा खोडून काढण्याची वेळ,’ नाना पटोले कडाडले
Nana Patole In Nanded : दोन वेळेस मुख्यमंत्री पद भोगलं, दहा पिढीचा उद्धार केला आणि आता काँग्रेसला शिव्या घालत आहेत, असं म्हणत नाना पटोले यांनी अशोक चव्हाणांवर टीका केली आहे.


नाना पटोले पुढे म्हणाले की, मुलगा किती ही बदमाश असेल, पण आईला कधीही शिव्या घालत नाही. बापावर रागावू शकतो, पण आईचे उपकार कधीही विसरू शकत नाही. ज्या काँग्रेसने मोठं केलं, त्या पक्षाला शिव्या घालत आहेत. जर अशोक चव्हाण काँग्रेस पक्षात नसते, भाजपमध्ये राहिले असते, तर त्यांचा उगम पण झाला नसता. भाजप अशोक चव्हाण सारख्यांना गाडून टाकते, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

काँग्रेसमध्ये राहून अशोक चव्हाण यांनी आपल्या दहा पिढीचा उद्धार केला आहे. भाजपमध्ये जात असताना चव्हाण यांनी कारखान्याची भूमिका मांडली. फडणवीस यांनी दीडशे कोटी दिले. अमित देशमुख यांचा कारखाना ३३०० रुपये भाव आणि अशोक चव्हाण यांच्या कारखान्यावर २५०० रुपये भाव मिळत आहे. हे शेतकऱ्यानां लुटत आहेत आणि ते पैसे इकडे निवडणुकीत लावणार, अशोक चव्हाण यांनी भोकरच्या जनतेच्या आशा-अपेक्षा विकल्या, अशी टीका पटोले यांनी यावेळी केली. भोकरमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस लढत नाही, तर हुकूमशहा विरुद्ध असल्याचं पटोले म्हणाले.
दोन वेळा मुख्यमंत्री पद भोगलं, तरी काँग्रेसला शिव्या; ‘अशोक चव्हाणांचा सातबारा खोडून काढण्याची वेळ,’ नाना पटोले कडाडले
पटोले पुढे म्हणाले की, या सरकारने सहा हजार कोटी रुपये जाहिरातीवर खर्च केला. ६७ हजार महिला महाराष्ट्रातून गायब झाल्या असून फडणवीस यांच्या मतदारसंघातूनही १३०० महिला गायब झाल्याचा आरोप करत महिलाविषयी यांना काही घेणं देण नाही. या सरकारने ग्रामीण भागाची जीवनवाहिनी बंद केली. रुग्णवाहिकेत आठ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार यांनी केला, तसंच गुजरामधून ड्रॅग आणणायचं सुरु आहे, महाराष्ट्राचा उडता पंजाब करायचं सुरू आहे, अशी टीका नाना पटोले यांनी यावेळी केली.