Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पुण्यात भासतेय रक्ताची टंचाई; नवरात्र, दिवाळीच्या सलग सुट्ट्यांचा परिणाम, रक्तदान करण्याचे रक्तपेढ्यांचे आवाहन

9

Blood Shortage In Pune: गेल्या महिन्यापासून विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला. त्यातच सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे अनेकांनी बाहेगावी जाणे पसंत केले. या कारणांमुळे रक्तदान शिबिरांच्या संख्येत मोठी घट झाली.

महाराष्ट्र टाइम्स
blood bank AI1

पुणे: दिवाळी, विधानसभा निवडणूक, खासगी कंपन्या आणि महाविद्यालयांना मिळालेल्या सुट्यांमुळे शहरातील रक्तदान शिबिरांची संख्या घटली असून, रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रक्त मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांसह रक्तपेढ्यांना शोधाशोध करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांचे नातेवाइक आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन करण्याची वेळ शहरातील बड्या रुग्णालयांच्या रक्तपेढ्यांवर आली आहे.

रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी रक्तपेढ्यांतर्फे आयटी कंपन्या, विविध संस्था आणि सोसायट्यांमध्ये शिबिर घेण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. गणेशोत्सव, नवरात्र आणि त्यानंतर आलेल्या दिवाळीमुळे सुट्ट्यांचा हंगाम सुरू झाला. गेल्या महिन्यापासून विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला. त्यातच सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे अनेकांनी बाहेगावी जाणे पसंत केले. या कारणांमुळे रक्तदान शिबिरांच्या संख्येत मोठी घट झाली. त्यामुळे तुटवडा निर्माण झाल्याचे रक्तपेढीतील डॉक्टरांनी सांगितले. रुग्णालयात दाखल कर्करोगी, विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया झालेले, गंभीर आणि यॅलेसेमियाच्या रुग्णांना तातडीची गरज असल्याने त्यांनी रक्त आरक्षित करून ठेवले. मात्र, आपत्कालीन परिस्थितीत रक्ताची गरज लागल्यास ते नेमके कुठून आणावे, असा प्रश्न रक्तपेढ्यांना पडला आहे. या पार्श्वभूमीवर रक्तपेढ्यांनी शिबिरांचे नियोजन सुरू केले असून, नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

‘ससून रक्तपेढीमध्ये दररोज सरासरी शंभर रक्तपिशव्यांची गरज भासते. येथून रुग्णालयात दाखल रुग्णांसह बाहेरील रुग्णांनाही रक्त उपलब्ध करून देण्यात येते. मात्र, सध्या तुटवडा भासत असल्याने रक्त उपलब्ध करून देण्यात अडचणी येत आहेत,’ अशी माहिती ससून रक्तपेढीचे प्रमुख डॉ. मंगेश सागळे यांनी दिली. ‘दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील रक्तपेढी’ चे डॉ. संजीव केतकर म्हणाले, ‘सध्या सर्व गटांच्या रक्ताची कमतरता जाणवत आहे. रुग्णांना पुरेसे रक्त मिळावे, यासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे १३ नोव्हेंबरनंतर रक्ताचा पुरेसा साठा उपलब्ध होईल. रुग्णांच्या नातेवाइकांसह हॉस्पिटलचे कर्मचारीही रक्तदान मोहिमेत गुंतले आहेत.’ दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या रक्तपेढीतर्फेही रक्तदात्यांना पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जीवघेणा ठरला नायलॉन मांजा! मांडीला गंभीर दुखापत, ९ वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू, नाशिकमधील घटना
सर्वच रक्तगटांचा तुटवडा
सध्या लाल पेशींसह सर्वत गटांच्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. प्लाझ्माचा पुरेसा साठा असून, मागणीनुसार प्लेटलेटची निर्मिती करण्यात येत आहे. रक्ताची साठवणूक करण्याचा कालावधी तीस ते पस्तीस दिवसांचा असल्याने त्यापेक्षा अधिक काळ रक्त साठवता येत नाही. दर वर्षी दिवाळीत रक्ताचा तुटवडा निर्माण होत असल्याने शिबिरांचे नियोजन करण्याची विनंती सामाजिक संस्थांनी केली आहे.

दैनंदिन रक्ताची मागणी किती?
पुणे शहर आणि परिसरामध्ये सर्व प्रकारची मिळून ७८० रुग्णालये आहेत. त्यामध्ये लहान, मध्यम आणि मोठ्या स्वरूपाच्या रुग्णालयांच्या समावेश आहे. शहरात सरकारी आणि खासगी मिळून ३५ रक्तपेढ्या आहेत. शहरात उपचार घेण्यासाठी जिल्ह्यासह राज्यातून रुग्ण येतात. त्यामुळे नेहमीच रक्ताची मागणी असते. शहरातील सर्व रुग्णालये मिळून दररोज सरासरी १५०० पिशव्यांची गरज भासते, प्रत्यक्षात मात्र, ७०० ते ८०० पिशव्यांचे संकलन होते. उन्हाळा आणि दिवाळीच्या दिवसांत रक्तदान शिबिरांची संख्या घटते. त्यामुळे दर वर्षी उन्हाळा आणि दिवाळीनंतर रक्ताचा तुटवडा निर्माण होतो.
आमच्या योजना बंद होणार नाहीत; Ladki Bahin Yojanaवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मोठं विधान
का भासतो रक्ताचा तुटवडा ?
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये पुण्यात रक्ताची कमतरता निर्माण होते. या कालावधीत महाविद्यालयांना सुट्टी असते. कंपन्यांमधील कर्मचारी गावाकडे किंवा पर्यटनासाठी पुण्याबाहेर गेलेले असतात. त्यामुळे रक्तदान शिबिरांची संख्या कमी होते. या सर्वांचा फटका सध्या पुण्यातील अत्यवस्थ रुग्णांना बसतो. दिवाळीच्या सुट्टीमुळे नियोजित शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढले आहे; तसेच अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांचीही वेगाने वाढली आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात रक्तगटनिहाय रक्तपिशव्या रुग्णांना देण्यात आल्या. त्याचा थेट परिणाम झाल्याची माहिती विविध रक्तपेढ्यांतील व्यवस्थापकांनी दिली.

सलग सणांमुळे गेल्या काही महिन्यांपासून रक्तदान शिबिरांची संख्या घटली आहे असे असले, तरी रक्ताची मागणी कमी झालेली नाही. त्यामुळे रक्ताचा तुटवडा भासत आहे. शहरातील विविध सोसायट्यांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. त्यातून काही साठा प्राप्त झाला आहे. आगामी काळात मोठ्या शिबिरांचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच रक्ताचा तुटवडा दूर होईल असा विश्वास आहे. – डॉ. आनंद चाफेकर, प्रमुख, केईएम रक्तपेढी

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.