Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; जोरदार धडकेने महिला बाहेर फेकली गेली, वाहन जळून खाक

7

Washim Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावरून नागपूरकडून जालनाकडे जात असताना चॅनल नंबर १९९ लोहारा गावाजवळ इनोव्हा कार क्र. जीजे ०३ बीजी ५००१ने अज्ञात वाहनाला मागून धडक दिल्याने कार पलटी होऊन बाजूच्या कठड्याला धडकली.

हायलाइट्स:

  • समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात
  • कारचालक महिला कारमधून बाहेर फेकल्या गेल्याने जागीच मृत्यू
  • इतर दोघे जखमी, कार जळून खाक
Lipi
समृद्धी महामार्ग कार अपघात

पंकज गाडेकर, वाशिम : वाशिमध्ये समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. एका अज्ञात वाहनाला ईनोव्हा कारने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक महिला ठार झाली आहे. तर कार जळून खाक झाल्याची घटना समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्हा हद्दीत भल्यापहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली आहे. आर्या शर्मा (वय २८) असं अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचं नाव असून दोनजण किरकोळ जखमी झाले आहेत.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावरून नागपूरकडून जालनाकडे जात असताना चॅनल नंबर १९९ लोहारा गावाजवळ इनोव्हा कार क्र. जीजे ०३ बीजी ५००१ने अज्ञात वाहनाला मागून धडक दिल्याने कार पलटी होऊन बाजूच्या कठड्याला धडकली. अपघात एवढा भीषण होता की, कार चालक महिला कारमधून बाहेर फेकली गेली आणि महिलेच्या डोक्याला गंभीर मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचवेळी कार बाजूच्या लोखंडी कठड्याला घासत गेल्याने घर्षण होऊन कारने पेट घेतला. कारमध्ये अजून दोघेजण होते. मात्र, समयसूचकता बाळगत त्यांनी कारमधून बाहेर पडत आपला जीव वाचवला.
Chinchwad Assembly Constituency: चिंचवड विधानसभेत IT इंजिनिअर निवडणुकीच्या मैदानात, आयटी कर्मचाऱ्यांनी ठरवलं तर आमदार होणार?

या अपघातात वाहन महिलाचालक आर्या शर्मा यांचा जागीच मृत्यू झाला तर गाडीतील तेजस पटेल (वय ३२) आणि सागर दर्जा (वय २८) यांच्या हाता-पायाला किरकोळ दुखापत झाली. अपघात झाल्याची माहिती लोहारा येथील शेतकऱ्यांनी श्री.गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रमेश देशमुख यांना दिली असता त्यांनी तात्काळ १०८ रुग्णवाहिकेचे पायलट आतिश चव्हाण आणि डॉक्टर बी.एस. राठोड यांना बातमी कळवली. दोघेही रुग्णवाहिका घेऊन अपघातस्थळी पोहोचून जखमींना कारंजा रुग्णालयात दाखल केले.

समृद्धी महामार्ग उपकेंद्र कारंजाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन दांदडे यांनी पोलीस उपनिरीक्षक राठोड, पोलीस कर्मचारी, एम.एस. एफ स्टाफ घटनास्थळी पोहोचून अपघाताचा पंचनामा केला तर अग्निशमन दलाने गाडीला लागलेली आग विझवली. अपघातग्रस्त कार १२०च्या स्पीडने लेनवर असून तिला बॅरिकेटिंग करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. पुढील तपास पोलिस करत आहेत.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.