Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

ज्याने धाराशिवच्या नावाला गद्दारीचा कलंक लागू दिला नाही त्या उमेदवाराला खंबीर साथ द्या- उद्धव ठाकरे

10

Maharashtra Election 2024: धाराशिवच्या लोकांनी लोकसभेत जशी ओमराजेंना साथ दिली तशीच साथ कैलास पाटील यांना द्यावी असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले.

Lipi

धाराशिव (रहीम शेख): जो व्यक्ती सोन्याच्या लंकेपर्यंत गेलेला असताना, त्यावर लाथ मारत आपली निष्ठा विकली नाही, ज्याने आपल्या धाराशिवच्या नावाला गद्दारीचा कलंक लावला नाही त्या कैलास पाटील यांना खंबीर साथ द्या, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले.

धाराशिवच्या जनतेने लोकसभेला आशीर्वाद दिला. जशी साथ तुम्ही ओमराजेंना दिली तीच साथ कैलास पाटील यांना द्यावी. या लोकसभा मतदार संघात असलेल्या सहाही मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून द्यावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. परंडा मतदार संघात ही गद्दारी झाली आहे त्यांना यावेळी हिसका दाखवून द्या, असेही आवाहन त्यांनी जनतेला केले.

लोकसभेला आपल्या पक्षाला सात आठ जागा कमी मिळाल्या व देशात सुद्धा अजून वीस पंचवीस ठिकाणी आपले खासदार झाले असते तर मोदी आता हिमालयात गेले असते असा चिमटा त्यांनी काढला. मला हिंदुत्व सोडल म्हणणाऱ्या भाजपने नवाब मलिक आणि अनेक ठिकाणी काय केले यांचाही जाब ठाकरे यांनी भाजपला विचारला.
जगातील एकही व्यक्ती सांगू शकत नाही की शरद पवार…; इतके स्पष्ट अन् थेट अजित पवार कधीच बोलले नाहीत
आमचं सरकार आल्यावर आम्ही जे करणार त्याचा वचन नामा दिला आहे पण महायुती कडून जुमला नामा दिलेला आहे, अडीच वर्ष सत्तेत असताना तुम्हाला या सगळ्या घोषणा प्रत्यक्षात आणता आल्या असत्या पण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फक्त थापेबाजी करणारी ही मंडळी आहे, आमचं सरकार स्थापन होताच त्यावेळी कशाचाही विचार न करता एका क्षणात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊन शब्द मी पाळला होता. मी शब्द पाळणारा आहे व आताही ज्या गोष्टी देणार असं सांगितलंय ते देऊनच दाखवणार असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

कचऱ्यापेक्षाही कमी किंमत या सरकारने सोयाबीनची केली आहे हे सरकारच कचरा असून त्यांनाच फेकून द्या, आम्ही तुम्हाला हमीभाव पण देऊ व जीवनावश्यक पाच वस्तूचे दर देखील स्थिर ठेवू असे वचन ठाकरे यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना हमीभाव देऊन दाखवला आहे त्यामुळं आताही ते देण्यासाठी सरकार हातात द्या असे आवाहन त्यांनी केले. तसेच सरकारी कर्मचारी यांची जुनी पेन्शन लागू करु तर आशा व अंगणवाडी सेविकाना वाढीव मानधन देऊ असेही आश्वासन त्यांनी दिले.
PM मोदी, अमित शहा, शिंदेंच्या बॅगा-हेलिकॉप्टर तपासा; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर पाहा निवडणूक आयोगाने काय उत्तर दिले
ओमराजे निंबाळकर…

ज्या व्यक्तीन आमदार झाल्यावर निष्ठा जपली संकट काळात पक्षाशी इमान राखल त्या माणसाला पुन्हा एकदा विधानसभेत पाठवा. मला या मतदार संघात 61 हजार मताधीक्य दिलंय त्यापेक्षा जास्त मतांनी कैलास पाटील यांना आमदार करावे असे आवाहन ओमराजे यांनी केले.

आमदार कैलास पाटील

ज्या पक्षामूळ व जनतेमूळ मला आमदार होता आलं याची जाणीव माझ्या मनात कायम राहणार आहे. कितीही संकटाचा काळ असू द्या मी पक्षाशी व जनतेशी प्रामाणिक राहीन असा शब्द त्यानी यावेळी दिला. आपण आणलेल्या शहरातील रस्ते तसेच कोट्यावधीचा निधी या सरकारने स्थगिती दिल्यानं खर्च होऊ शकला नाही. या अश्या लोकांनी विकासावर मत मागावे का असा सवाल यावेळी आमदार कैलास पाटील यांनी विरोधकाना केला.

जयकृष्ण नायर

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.