Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
साप्ताहिक अंकशास्त्र, 18 to 24 नोव्हेंबर 2024 : मूलांक 2 आर्थिक वृद्धी, व्यवसायात प्रगती ! मूलांक 7 अहंकाराला दूर ठेवा ! मूलांक 1 ते 9 साठी अंकशास्त्रानुसार जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
Weekly Numerology Prediction 18 to 24 November 2024 : नोव्हेंबर महिन्यातील हा तिसरा आठवडा आहे. बुधादित्य राजयोगाचा प्रभाव सगळ्या मूलांकावर असेल. या आठवड्यात मूलांक 1 असणाऱ्यांनी या आठवड्यात निर्णय घेताना प्रॅक्टिकल राहून निर्णय घ्यावेत. मूलांक 2 साठी आर्थिक वृद्धी आणि व्यवसायात प्रगती आहे तर मूलांक 4 असणाऱ्यांची करियरमध्ये प्रगती आहे. मूलांक 6 ला नवीन गुंतवणूक लाभदायक तर मूलांक 8 च्या लोकांना कामा संदर्भात ताणतणाव वाढणार आहे. मूलांक 9 च्या जातकांसाठी या आठवड्यात धनलाभाचे योग असून कामात फोकस राहा. तुमचा मूलाकं काय सांगतो? मूलांक 1 ते मूलांक 9 साठी आठवडा कसा असेल ते पाहूया.
मूलांक 1 (जन्म तारीख १, १०, १९, २८): प्रॅक्टिकल राहून निर्णय घ्या
हा आठवडा तुमच्यासाठी उत्तम असून तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती करणार आहात. तुम्ही या आठवड्यात जे काही निर्णय घ्याल ते प्रॅक्टिकलपणे घ्या. आर्थिक प्रगती आहे त्यामुळे गुंतवणुकीचा विचार करायला हरकत नाही. लवलाइफ चांगले असून संबंध अधिक दृढ होतील. आठवड्याच्या शेवटी काही बदल होतील तसेच काही महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.
मूलांक 2 (जन्म तारीख २, ११, २०, २९): आर्थिक वृद्धी, व्यवसायात प्रगती
हा आठवडा तुमच्यासाठी चांगला असून प्रोजेक्ट पूर्ण होवून तुम्हाला यश मिळेल. तुमची वाटचाल प्रगतीच्या मार्गाने होते आहे. आर्थिक वृद्धी होणार असून तुम्हाला गुंतवणुकीतून चांगला फायदा होईल. प्रेमसंबंधात नाते अधिक दृढ होईल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला काही बदल जाणवतील, ते तुमच्यासाठी सकारात्मक असतील.
मूलांक 3 (जन्म तारीख ३, १२, २१, ३०): कामात टेन्शन जाणवेल
हा आठवडा तुमच्यासाठी ठिक आहे. प्रेमसंबंधात सुख-समृद्धीचे योग आहेत. नोकरी किंवा व्यवसायात मन लागणार नाही. एकप्रकारची काळजी तुम्हाला सतावेल. कोणतेही प्रोजेक्ट करताना मनात भीती असेल. आर्थिक खर्च जास्त होत आहेत तेव्हा गुंतवणुकीवर लक्ष द्या. आठवड्याच्या शेवटी भागीदारीतील प्रोजेक्ट्स यशस्वी होतील. सेलिब्रेशनचा मूड आहे. तुम्ही प्रियजन आणि कुटुंबासोबत एखाद्या कार्यक्रमाला जाणार आहात.
मूलांक 4 (जन्म तारीख ४, १३, २२, ३१): करियरमध्ये प्रगती, नवे प्रोजेक्ट मिळणार
हा आठवडा तुमच्यासाठी उत्तम असून नवीन प्रोजेक्ट्स मिळण्याची शक्यता आहे. करियरमध्ये प्रगतीच्या मार्गावर तुमची वाटचाल होते आहे तेव्हा कामात फोकस कायम ठेवा. आर्थिक दृष्टिकोनातून आठवडा चांगला असून धनवृद्धीचे योग आहेत. गुंतवणुकीतून फायदा होणार आहे. लवलाइफ चांगली आहे. आठवड्याच्या शेवटी चांगली बातमी मिळू शकते.
मूलांक 5 (जन्म तारीख ५, १४, २३): गुंतवणुकीतून फायदा, कामात फोकस हवा
हा आठवडा तुमच्यासाठी चांगला असून गुंतवणुकीतून चांगला फायदा होणार आहे. लवलाइफ चांगली आहे. तुम्ही निर्णय घेताना नीट चौकशी करा आणि लगेच निर्णय घेवून टाका. कामात टाळाटाळ करणे तुम्हाला त्रासदायक ठरू शकते. कामे वाढत आहेत तेव्हा नियोजन आणि फोकस महत्त्वाचा आहे. आठवड्याच्या शेवटी काही कारणामुळे मन दुःखी होवू शकते.
मूलांक 6 (जन्म तारीख ६, १५, २४): नवीन गुंतवणूक लाभदायक
हा आठवडा तुमच्यासाठी चांगला असून प्रोजेक्ट यशस्वी होतील आणि व्यवसायात ही तुम्हाला लाभ होणार आहे. करियर संदर्भात चांगली बातमी मिळेल. नवीन गुंतवणुकीमुळे उत्तम लाभ होईल. लवलाइफ चांगली आहे. आठवड्याच्या शेवटी तुमचा अनुभव आणि हुशारी यांच्या आधारावर निर्णय घ्या, तुम्हाला यश मिळेल.
मूलांक 7 (जन्म तारीख ७, १६, २५): आर्थिक स्थितीत सुधारणा, अहंकाराला दूर ठेवा
हा आठवडा ठिक असून आर्थिक स्थितीमध्ये हळूहळू सुधारणा होते आहे. लवलाइफ ठिक असून प्रेमात बहार येईल. ऑफिसमध्ये काम करताना किंवा व्यवसाय स्थळी तुम्हाला अचानक गर्वाची बाधा होवू शकते. आपण फार ग्रेट आहोत असे वाटेल आणि तुम्ही तसे वागू लागाल, असे करू नका. अहंकाराला दूर ठेवा. आठवड्याच्या शेवटी कामे मार्गी लागतील आणि चांगली बातमी मिळेल.
मूलांक 8 (जन्म तारीख ८, १७, २६): कामा संदर्भात ताणतणाव वाढणार
हा आठवडा तुमच्यासाठी ठिक असून आर्थिक बाबतीत हळूहळू सुधारणा होईल, धनलाभाचे योग आहेत. नोकरी किंवा व्यवसायात अशी काही बातमी मिळेल त्यामुळे तुम्ही दुःखी होवू शकता. प्रोजेक्ट संदर्भात मनात भीती निर्माण होईल, कामे होतील की नाही याचे टेन्शन तुम्हाला त्रास देत राहील. लवलाइफ ठिक आहे. आठवड्याच्या शेवटी प्रियजन आणि मित्रांसोबत बाहेर जाणार आहात.
मूलांक 9 (जन्म तारीख ९, १८, २७): धनलाभाचे योग, कामात फोकस ठेवा
हा आठवडा तुमच्यासाठी शुभ असून धनलाभाचे योग आहेत. लवलाइफमध्ये काही कारणामुळे नाराजीचे सूर असतील. काम करताना मन थोडं बेचैन राहू शकतं. व्यवसाय भागिदारीत करत असाल तर कामात अडचणी येवू शकतात. आठवड्याच्या शेवटी आनंदी वातावरण असून सुखसमृद्धीचे योग जुळून येणार आहेत.