Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मोदीजी राहुल गांधींची बहीण सांगते, बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसची विचारधारा वेगळी पण… प्रियंका गांधींचा पलटवार
Priyanka Gandhi Commented on PM Modi remarks: राहुल गांधी यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल चांगले बोलण्यास सांगा, असे मोदींनी प्रचारादरम्यान ठाकरे यांना उद्देशून बोलले होते. त्याला आज काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी उत्तर दिले आहे.
शिर्डी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारासाठी प्रियंका यांची शनिवारी सभा झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, महाविकास आघाडीचे उमेदवार, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
प्रियंका गांधी म्हणाल्या, महाराष्ट्राची भूमी धार्मिक कट्टरता न ठेवता समानतेचा पुरस्कार करते. या भूमीचा देशाच्या स्वातंत्र्यापासून देशाच्या जडणघडणीत मोठा वाटा आहे. ही संतांची भूमी आहे. मात्र, गेल्या काही काळात येथील राज्यकर्ते खोटे बोलून जनतेच्या भावनांशी खेळत आहेत. शिवरायांचा अपमान करतात आणि त्यांचेच नाव घेऊन राजकारण करतात.
Mumbai Congress Manifesto : चिदंबरम आले, पण मुंबईचा जाहीरनामा प्रकाशित न करताच निघाले, वर्षा गायकवाडांकडून मनधरणी, मात्र…
‘प्रचारासाठी येथे आलेल्या मोदींनी माझा भाऊ राहुल याला आव्हान दिले होते. आज राहुल यांची बहीण म्हणून मी मोदींना उत्तर देते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसची विचारधारा वेगळी होती. मात्र ठाकरे आणि काँग्रेस दोघांनीही शिवरायांचा सन्मान केला. शिवरायांचा आपमान येथे सहन केला जाणार नाही. माझा भाऊ राहुल याच्यावर नेहमी खोटे आरोप करणाऱ्या मोदींना माझे आव्हान आहे त्यांनी जाहीरपणे जातीनिहाय जनगणना करणार याची घोषणा करावी. आरक्षणाच्या मर्यादा ५० टक्केच्या पुढे नेणार हेही जाहीर करावे. मात्र, तसे न करता ते माझ्या भावाला आरक्षण विरोधी ठरवत आहेत. ज्याने देशभर पायी यात्रा करून लोकांच्या भावना जाणून घेतल्या. न्याय यात्रा काढून न्यायाची मागणी केली, जातीनिहाय जनगणना आणि आरक्षणाचा पुरस्कार केला. त्याला तुम्ही आरक्षण विरोधी ठरविता? याचा अर्थ तुम्ही घाबरला आहात म्हणून खोटे बोलत आहात. मात्र, हा जनतेचा आपमान आहे, जनता तो सहन करणार नाही,’ असेही प्रियंका गांधी म्हणाल्या.
महाराष्ट्रातील परिस्थितीबद्दल बोलताना प्रियंका म्हणाल्या, या राज्यात लोकांनी निवडून दिलेले सरकार होते. मात्र, पैशाचा आणि यंत्रणांचा वापर करून यांनी ते चोरले आहे. कोणतीही आई आपल्या सर्व मुलांवर समान प्रेम करते. मात्र, भाजप महाराष्ट्रासोबत दुजाभाव करून येथील उद्योग गुजरातला नेत आहे. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी देशाची उभारणी करताना असा भेदभाव कधीच केला नाही. सर्व राज्यांत विविध संस्था उभ्या केल्या. पुढे काँग्रेसच्या काळातही असा भेदभाव कधी झाला नाही. अशा सरकारला ध़डा शिकविण्याचा अधिकार तुमच्या हातात आहे. यावेळी महाविकास आघाडीला असे बहुमत द्या की, भाजपने कितीही प्रयत्न केले तरी सरकार पुन्हा चोरता येणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
शिर्डीतील स्थानिक परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केले. ‘या मतदारसंघात दहशतीचे वातावरण आहे, असे मला ऐकायला मिळाले आहे. मात्र, हे संपविणे तुमच्याच हातात आहे. आता निर्भयपणे मतदान करा आणि येथील दहशत मोडून काढा. जो धमकावतो, तो सर्वांत भित्रा असतो, हे लक्षात ठेवा. शेतकरी आणि युवांनी ठरविले तर ते काहीही करू शकतात. त्यामुळे असे राजकारण पुन्हा आपल्या राज्यात येणार नाही, याची काळजी घ्या,’ असेही त्या म्हणाल्या.