Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नाशिकच्या नामांकित हॉटेलमध्ये ५ कोटी जप्त, शिंदे गटाच्या मोठ्या नेत्याचा समावेश; नाव समोर

5

Nashik Hotel Radisson Bloom Seized 5 Crore: शिवसेना शिंदे गटाचे नाशिक संपर्कप्रमुख जयंत साठे, पक्ष निरीक्षक ललित वानखेडे यांच्या रूम नंबर ७०७ मध्ये ही पाच कोटींची रक्कम आढळून आली आहे.

हायलाइट्स:

  • नाशिकच्या नामांकित हॉटेलमध्ये ५ कोटी जप्त
  • शिंदे गटाच्या मोठ्या नेत्याचा समावेश
  • शिवसेना शिंदे गटाचे नाशिक संपर्कप्रमुख जयंत साठेंचा समावेश
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
नाशिक शिंदे गट संपर्कप्रमूख जयंत साठे

नाशिक : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु आहे. येत्या २० नोव्हेंबरला राज्यात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडत आहे. तर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. त्यातच आज विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. एकीकडे प्रचाराचा उत्साह शिगेला पोहोचला असताना दुसरीकडे निवडणूक आयोगाने नाशिकमध्ये एक मोठी कारवाई केली आहे. एका नामांकित हॉटेलमधून तब्बल पाच कोटींहून अधिक रक्कम जप्त केली आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.नाशिक शहरात नामांकित असलेलं हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने छापा टाकला. त्यात शिवसेना शिंदे गटाचे नाशिक संपर्कप्रमुख जयंत साठे, पक्ष निरीक्षक ललित वानखेडे यांच्या रूम नंबर ७०७ मध्ये ही पाच कोटींची रक्कम आढळून आली आहे. याच रूममधून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना पैसे वाटप सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. त्याठिकाणी नाशिक शहरातील शिवसेना शिंदे गटाचे आजी-माजी नगरसेवक तसेच पदाधिकारी देखील उपस्थित होते.
Amboli Ghat Accident: बाईकवरील ताबा सुटल्याने कठड्याला धडकली, युवक २०० फूट दरीत; आंबोली घाटात भीषण अपघात

या हॉटेलमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या नावे २ खोल्या बूक होत्या. छाप्यादरम्यान एका काळ्या रंगाच्या कारमध्ये पैशांच्या बॅगा सापडल्या. पाच कोटींपैकी २ कोटी जप्त केले असून, उर्वरित पैशांचा शोध सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.