Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

शंकर जगताप आणि राहुल कलाटे यांच्यात कोण ठरणार वरचढ?, विजयाची माळ कोणाच्या गळ्यात?

9

Pune Chinchwad Vidhan Sabha Election 2024 Result, Shankar Jagtap vs Rahul Kalate : चिंचवड विधानसभेच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. शंकर जगताप आणि राहुल यांच्यात रंगत बघायला मिळतेय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

चिंचवड : चिंचवड विधानसभेच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा आहेत. लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणुक त्यांच्या पत्नी आश्विनी जगताप यांनी लढवली आणि त्या निवडूण देखील आल्या. मात्र, यादरम्यान जगताप कुटुंबियांमध्ये वाद बघायला मिळाला. विधानसभेसाठी एकीकडे आश्विनी जगपात सुरूवातीला उमेदवारी मागत होत्या तर दुसरीकडे लक्ष्मण जगताप यांचे छोटे बंधू शंकर जगताप हे देखील विधानसभेसाठी तयारी करत होते. शेवटी पक्षाने निर्णय घेत आणि आश्विनी जगताप यांनी माघार घेतल्यानंतर शंकर जगताप यांनी उमेदवारी मिळाली. दुसरीकडे राहुल कलाटे आणि शंकर जगताप यांच्या सामना बघायला मिळेल. लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात राहुल कलाटे यांनी यापूर्वी निवडणूक लढवली. मुळात म्हणजे चिंचवड विधानसभेत गावकी भावकीचे वर्चस्व आहे. शंकर जगताप हे प्रचारामध्ये पुढे होते.

Live Update – चिंचवड मतदारसंघातून शंकर जगताप यांनी पाचव्या फेरीअखेर २०१४२ मतांनी आघाडी घेतली आहे. शरद पवार गटाचे राहुल कलाटे दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.