Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महायुतीचा विजय दमदार, ठाकरे-पवारांचे राजकीय भवितव्य धोक्यात; महाराष्ट्रातील सत्तेचे गणित काय, जाणून घ्या
Shivsena UBT And NCP Sharad Pawar Political Career Shaken : महाराष्ट्रात महायुतीचा मोठा विजय झाला आहे. मविआला केवळ ४९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. ठाकरे गट आणि शरद पवार गटाला दोन अंकी जागाच आपल्या बाजूने खेचता आल्या आहेत. त्यामुळे ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या राजकीय भवितव्य काय असणार असा सवाल राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.

लोकसभेत स्ट्राईक रेट कमी असणाऱ्या शिंदेसेनेने देखील यंदा मोठी मुसंडी मारली आहे. असे असले तरी मुख्यमंत्री पदासाठी अपेक्षित संख्याबळ शिवसेनेकडे नाही. तिकडे भाजपचा मात्र आजपर्यंतचा मोठा स्ट्राईक रेट दिसून येत आहे. यामध्येच या अभुतपूर्व विजयामागील चाणक्य कोण? यात मात्र फडणवीसांचे नाव आघाडीवर आहे. अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर शिंदे-भाजप सरकारच्या स्थैर्यासाठी भाजप पक्षश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री केले होते. पण यावेळी पुन्हा भाजप शिवसेनेत मुख्यमंत्रीपदासाठी पुन्हा अडीच वर्षाचा सौदा झाला असल्याचे समजते.Beed News: मुंडे बहीण-भाऊ निवडणुकीत एकत्र, मंत्रिपदासाठी आमनेसामने, बीडमध्ये मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात?
पक्षफुटीनंतर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मात्र ठाकरे सेना शिंदेसेनेवर भारी पडली होती. शिंदेसेनेला केवळ ७ जागांवर समाधान मानावे लागले. राज्यातील विधानसभा निवडणुकीही दोन्ही शिवसेनेसाठी पक्षाच्या भविष्यासाठीची कसोटी ठरली आहे. सॉफ्ट हिंदुत्वाची नस पकडलेल्या ठाकरे सेनेच्या २० जागा कमी झाल्या, त्यापैकी फक्त मुंबईत १० जागा मिळाल्या. शिंदे सेनेला मुंबईत फक्त ६ जागा मिळाल्या, पण पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ५१ जागा जिंकल्या असून ठाकरे सेनेला पराभव पचवावा लागला आहे.
यातच या निवडणुकीत भाजप विरोधात आक्रमकपणे प्रचार करणाऱ्या शरद पवारांचा करिष्मा देखील कामी आलेला नाही. तर दुसरीकडे अजित पवारांचे संख्याबळ मात्र वाढले आहे. काकांपेक्षा चौपट जागांवर अजित पवारांचा बोलबाला आहे. आता महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका थेट पाच वर्षांनी होणार आहेत. दरम्यान केंद्रात किंवा महाराष्ट्रात सत्ताबदल होण्याची शक्यताही धुसर झाली आहे. आता संपूर्ण जबाबदारी पंचायत आणि नागरी निवडणुकांवर अवलंबून असणार आहे. राजकारणातील चाणक्य समजल्या जाणाऱ्या शरद पवार यांची ही शेवटची निवडणूक असल्याचीही चर्चा आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शरद पवारांनी राजकारणातून निवृत्त होणार असल्याचीही घोषणा केली होती. अजित पवारांनी मात्र शरद पवारांच्या पुढच्या विचारांचा कोणीही अंदाज बांधू शकत नाही, असे वक्तव्य केले. विधानसभा निवडणुकीत काकांपेक्षा चौपट जागा जिंकल्याने पवार घराण्याचा वारसा पुढे नेण्यासाठी आपण सज्ज असल्याचे दाखवून अजित पवारांनी आता दाखवून दिले आहे.