Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

माझ्यामुळे सत्ता स्थापनेत कुठलीही अडचण नाही, मोदींना फोन; शिंदे म्हणाले – भाजपचा निर्णय मान्य

4

Eknath Shinde Press Conference: गेल्या दोन तीन दिवसांपासून मौन साधलेले एकनाथ शिंदे यांनी अखेर मौन सोडलं आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत अनेक गोष्टींबाबत माहिती दिली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

ठाणे: मी अडीच वर्षांच्या कारर्कीदीत समाधानी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांना धन्यवाद देतो. शरीरातील शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत महाराष्ट्रासाठी काम करेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील पत्रकार परिषदेत प्रतिपादन केले.

मुख्यमंत्रिपदाचा निरोप घेताना एकनाथ शिंदे हे भावूक झालेले दिसले. त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी आणि त्यांनी केलेल्या कामाबाबत सांगितलं. मी एक कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ताच राहिल, असं ते म्हणाले. तसेच, मी स्वत:ला कधीही मुख्यमंत्री समजलं नाही तर एक सामान्य माणूस समजलं आणि म्हणून मी सामान्य माणसांमध्ये जाऊ शकलो, असंही ते म्हणाले.
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी भेटीगाठी नाकारल्या, आमदारांना मुंबई सोडण्याचे आदेश, कारण काय?
यावेळी ते महायुतीच्या सत्ता स्थापनेबद्दलही बोलले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केल्याचं त्यांनी सांगितलं.

सत्ता स्थापनेचं घोडं कुठेही अडलेलं नाही, सगळ्या पदापेक्षा लाडका भाऊ हे मोठं पद आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून सांगितलं की, सरकार बनवताना कुठेही अडचण आहे असं मनात आणू नका, असे शिंदे म्हणाले. तुम्ही जो निर्णय घ्याल, तो मला मान्य असेल, असंही ते म्हणाले. मुख्यमंत्रिपदाबाबत भाजप जो निर्णय घेईल तो एकनाथ शिंदे आणि शिवसेनेला मान्य असेल, असे शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

निकाल लागल्यापासून एकनाथ शिंदे यांनी मौन पाळलं होतं. त्यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं, त्यांनी आमदारांशी भेटीगाठी टाळल्या त्यामुळे मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज असल्याचं बोललं जात होतं. त्यावरही शिंदेंनी स्पष्ट उत्तर दिलं आहे. आम्ही असे नाराज होऊन रडणारे लोक नाही, लढणारे लोक आहोत. लढून काम करणारे लोक आहोत. त्यामुळे मी स्वत: सांगतो की एवढा मोठा जो विजय झाला त्याची ऐतिहासिक गणणा होते, त्याचं कारण म्हणजे आम्ही जीव तोडून मेहनत केली, घरी बसलो नाही लोकांमध्ये गेलो. आम्ही मनापासून काम केलं.

Eknath Shinde: माझ्यामुळे सत्ता स्थापनेत कुठलीही अडचण नाही, मोदींना फोन; शिंदे म्हणाले – भाजपचा निर्णय मान्य

मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेला काय मिळालं, काय सुख मिळालं, काय आम्ही देऊ शकलो हे आमचं उद्धिष्ट होतं. मला आनंद आहे की, लाडक्या बहीण, लाडक्या भाऊ कामाला लागले. गेल्या अडीच वर्षात जे प्रेम मिळालं, त्यांना वाटतं की हा आपल्यातला मुख्यमंत्री आहे. मी प्रत्येकाला भेटलो, जनतेतला मुख्यमंत्री म्हणून जी ओळख मिळाली त्याला फार नशीब लागतं, असंही शिंदे म्हणाले.

नुपूर उप्पल

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.