Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

ढाब्यावर उभ्या असलेल्या ट्रकमधुन २लाख ७०हजार रूपये किंमतीच्या एस.एस वायर ची चोरी..!

19

एरंडोल:येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ लगत च्या साईनाथ ढाब्यावर उभ्या असलेल्या ट्रकमधुन २लाख ६९हजार नऊशे८१ रूपये किंमतीच्या ६.९२एम एम जाडीच्या निळ्या रंगाच्या एस.एस.वायरचे ८बंडल लंपास झाल्याचे उघडकीस आले.
उल्हासनगर येथील साईसेवा ट्रान्सपोर्ट चे मालक संदीप गंगा चौबे यांनी एरंडोल पोलीस स्टेशन ला फिर्याद दिली असून ट्रकचालक राजकुमार शिवयग्य तीवारी यानेच सदरील चोरी केल्याचा संशय व्यक्त केला आहे.
ट्रक क्रमांक एम.एच.०५ डि. के.०५०६ या ट्रकमध्ये एकूण १०३ एस.एस वायरींचे रोल बंडल भरलेले होते.
पुढील तपास हेड काँन्स्टेबल पंकज पाटील व राजेश पाटील हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.