Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Chhatrapati Sambhajinagar Accident News: घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी फैजान याला तपासून मृत घोषित केले तर नागरिकांनी हायवा चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले.
हायलाइट्स:
- खडी वाहतूक करणाऱ्या भरधाव हायवाने चिरडले
- भाचा ठार, मामा गंभीर जखमी
- छत्रपती संभाजीनगरमधील हृदयद्रावक घटना
‘अण्णा हजारेंना शांत झोप लागलीय, त्यांना इतकी…’; सलग दुसऱ्या दिवशी संजय राऊत कडाडले
सकाळच्या सुमारास झालेल्या हा अपघात बघून बघ्यांची एकच गर्दी जमली होती. दरम्यान, काही नागरिकांनी त्यांना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी फैजान याला तपासून मृत घोषित केले तर नागरिकांनी हायवा चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
दिवसाअगोदर वाहनांना परवानगी नाही
हा अपघात सकाळी दहा वाजता सुमारास घडला. दिवसा सकाळी आठनंतर वाहनांना परवानगी नाही. मग खडी वाहतूक करणारा हायवा आला कसा? असा प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.