Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Pune News: वाहतूक कोंडीसाठी सतत चर्चेत असलेल्या आनंदऋषीजी चौकातील दुहेरी उड्डाणपुलाचे (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रवेशद्वार) ८२ टक्के काम पूर्ण झाले आहे.
गणेशखिंड रस्त्यावर वाहनांची वर्दळ खूप असल्याने काम करण्याला मर्यादा येत आहेत. महापालिकेकडून भूसंपादनासाठी आणि वाहतूक पोलिसांकडून वाहतूक बदलांसाठी विविध परवानग्या मिळविण्यासाठी उशीर झाल्याने पुलाच्या कामाला विलंब झाल्याची कबुली ‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’च्या (पीएमआरडीए) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे नव्या वर्षातच या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. हिंजवडी हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचे काम ‘पीएमआरडीए’ने हाती घेतले आहे. या प्रकल्पासाठी विद्यापीठासमोरील आनंदऋषीजी चौकातील उड्डाणपूल २०२० मध्ये पाडण्यात आला. त्या ठिकाणी दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. हे काम जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना यापूर्वी झालेल्या ‘पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणा’च्या (पुम्टा) बैठकीत देण्यात आल्या होत्या. मात्र, चौकातील सेवा वाहिन्या स्थलांतर करण्याचे काम महापालिकेकडून वेळेत पूर्ण झाले नाही; तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. म्हणून वाहतूक पोलिसांनी गणेशखिंड रस्त्यावर सुरक्षा (बॅरिकेडिंग) करण्यास पीएमआरडीए’ला परवानगी दिली नव्हती. त्यामुळे या चौकातील काम सुरू होण्यास विलंब झाला.
दुमजली उड्डाणपुलाची वैशिष्ट्ये
■ उड्डाणपुलाची एकूण लांबी १.५० कि.मी. (रॅम्पसह) आणि १११२.५२ मीटर ‘व्हायाडक्ट’ची लांबी
■ औंध, बाणेरकडून शिवाजीनगरकडे जाण्यासाठी प्रत्येकी दोन मार्गिका अप रॅम्पसह उड्डाणपूल.
■ शिवाजीनगरकडून बाणेर, पाषाणकडे जाण्यासाठी तीन मार्गिका उड्डाणपूल व पुढे प्रत्येकी दोन मार्गिका डाउन रॅम्प.
■ औंध, बाणेर, पाषाणकडून सेनापती बापट रस्त्याला जाण्यासाठी गणेशखिंड रस्त्यावरून जाण्याची व्यवस्था करण्यात आले.
गणेशखिंड रस्त्यावरील ‘ई-स्वेअर’ येथून हा पूल सुरू होऊन बाणेर येथे ज्या ठिकाणी उतरणार आहे, त्यासाठी ४२ खांब उभारण्यात येणार आहेत. मुख्य चौकात खांब उभारल्यास वाहतुकीला अडथळा निर्माण होईल म्हणून मुख्य चौकात एकही खांब न उभारता दोन खांबांमध्ये ५५ मीटर लांबीचे आणि सुमारे १८ ते २० मीटर रुंदीचे ‘स्पॅन’ टाकण्याचे प्रस्तावित आहे. उड्डाणपुलाचे काम २०२३ मध्ये सुरू झाल्यानंतर जानेवारी २०२४, त्यानंतर ऑगस्ट आणि त्यानंतर नोव्हेंबरची मुदत देण्यात आली होती. मात्र, या मुदतीमध्येही काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे येथून दररोज ये-जा करणाऱ्या पुणेकरांची वाहतूक समस्येतून नव्या वर्षातच सुटका होण्याची शक्यता आहे. येथे उभारण्यात येणाऱ्या दुमजली उड्डाणपुलाचे काम जवळपास ८०-८२ टक्के पूर्ण झाले असून, उरलेले काम तातडीने करण्यात येत आहे.
देवेंद्र फडणवीसांना कुबड्यांची गरज नाही; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचा कौतुकाचा वर्षाव, म्हणाले…
विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे ८२ टक्के काम म पूर्ण झाले आहे. चौकात ५५ मीटरचा स्पॅन असल्यामुळे रात्रीच्या सुमारास स्टील गर्डरचे काम करण्यात येत आहे. पाषाण, बाणेरकडील रॅम्पची कामे राहिली आहेत. या ठिकाणी सेवा रस्त्यासाठी खूप कमी जागा राहत असल्याने वाहतूक वळविण्याचे नियोजन करून परवानगी घेतली जाईल. काम करण्याची परवानगी मिळाल्यानंतर ही कामे तातडीने केली जातील. उड्डाणपुलाच्या कामासाठी ३० नोव्हेंबरची मुदत दिली होती. मात्र, या ठिकाणी काम करण्यासाठी मिळणाऱ्या परवानग्यांमुळे ही मुदत पुढे सरकत आहे. लवकरात लवकर काम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. – रिनाज पठाण, मुख्य अभियंता, ‘पीएमआरडीए’
मालेगाव, येवल्यात मॉकपोल; अपक्ष बच्छाव, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माणिकराव शिंदे यांनी भरले शुल्क
उड्डाणपुलाचे काम एका दृष्टिक्षेपात…
■ १४ जुलै २०२० रोजी उड्डाणपूल पाडण्यात आला.
■ उड्डाणपुलाचे काम वगळता मेट्रो मार्गिकेचे काम गतीने सुरू.
■ उड्डाणपूल उभारण्यासाठी जानेवारी २०२४ची मुदत.
■ कामास विलंब झाल्याने ऑगस्ट २०२४ची मुदत.
■ ही मुदत उलटून ३० नोव्हेंबर २०२४ची मुदत.