Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Alert! मुंबईतील या भागात फुफ्फुस, हृदय, डोळ्यांच्या समस्या, कारण काय? डॉक्टरांनी दिला सल्ला

20

Maharashtra Mumbai Weather : मागील महिन्याभरापासून वायू प्रदूषणात वाढ झाली असून मीरा-भाईंदरमध्ये याचं प्रमाण वाढलं आहे. हृदयविकार, दमा आणि फुफ्फुसांसंबंधी समस्या असणाऱ्यांना याचा अधिक त्रास होत आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : राज्यात थंडीचा कडाका वाढतो आहे. अशात महाराष्ट्रातील अनेक भागात वायू प्रदूषणही वाढत आहे. मुंबईत मीरा-भाईंदरमध्ये गेल्या महिनाभरात वायू प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये हवेची गुणवत्ता खालावली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये हवेची पातळी १५० AQI होती. ही पातळी समाधानकारक स्थितीत होती. मात्र नोव्हेंबरमध्ये ही पातळी २८४ AQI वर पोहोचली आहे. हा वायू गुणवत्तेचा सर्वाधिक खराब स्तर मानला जात आहे.

प्रदूषणामुळे अनेकांना आरोग्याच्या तक्रारी

शहरातील हवेची स्थिती अशा प्रकारे राहिल्यास येत्या काही दिवसांत प्रदूषणाची पातळी वाईट ते अतिशय वाईट पातळीवर पोहोचेल. याशिवाय शहरातील हवेत पार्टिक्युलेट मॅटर अर्थात PMचे प्रमाणही वाढत आहे. पार्टिक्युलेट मॅटरची पातळी वाढल्याने याचा लोकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. या PM चा परिणाम केवळ फुफ्फुसांवरच परिणाम करत नाही, तर डोळे आणि श्वसनमार्गाला देखील मोठं नुकसान होऊ शकतं.
मुंबईकरांची चिंता वाढली! वायू प्रदूषण धोकादायक स्तरावर; या भागात सर्वात खराब हवा, तज्ज्ञांनी कारणही सांगितलं
मागील काही दिवसांपासून शहरात काही लोकांना डोळ्यांची जळजळ होण्याच्या समस्येत वाढ झाली आहे. अनेकांनी या तक्रारी केल्या आहेत. या सर्व समस्यांनंतर वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी, प्रदूषण नियंत्रण विभागाच्या उपाययोजना प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याऐवजी कागदोपत्रीच मर्यादित असल्याचे दिसून येत आहे.

काय काळजी घ्या? डॉक्टरांनी दिला सल्ला

शहरात प्रदूषणामुळे हृदय, फुफ्फुस आणि दम्याच्या रुग्णांच्या समस्या वाढल्या आहेत. डॉ. राजेश शुक्ला यांनी सांगितलं, की शहरात सकाळी जॉगिंग करणं अवघड झालं आहे. शहरातील सततच्या काँक्रिटीकरणामुळे हवेची गुणवत्ता खालावली असल्याचं ते म्हणाले. तसंच अशा सततच्या बांधकामांमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असून यामुळे हवेतील PM २.५ आणि PM १० पार्टिकल्स यामुळे डोळ्यांवर परिणाम होत आहे. तसंच प्रदुषणामुळे डोळ्यांत जळजळ आणि अंधुक दिसणं अशा समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे वाहन चालवताना डोळ्यांना चष्मा लावण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
पत्नी बाहेरुन आली, पतीला समोर पाहताच हंबरडा फोडला; चिठ्ठी लिहून शिक्षकाने उचललं टोकाचं पाऊल
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, शहरातील हवेत पीएम अर्थात पार्टिक्युलेट मॅटर २.५ आणि पीएम १० अशी पार्टिकलची पातळीही वाढली आहे. WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनुसार हवेतील पीएम २.५ आणि पीएम १० पार्टिकल्स अनुक्रमे १५ आणि ४५ पेक्षा जास्त नसावेत, परंतु मीरा-भाईंदरमध्ये हा आकडा अनुक्रमे २०० आणि ३०० च्या पुढे गेला आहे. हा आकडा निर्धारित मानकांपेक्षा ५ ते १० पट अधिक आहे.

काय आहे पीएम २.५ आणि पीएम १०?

PM २.५ आणि PM १० हे कण अनुक्रमे २.५ आणि १० मायक्रोन व्यासाचे कण असतात, जे हवेत असतात. हे इतके लहान आहेत की ते श्वसनमार्गाद्वारे फुफ्फुसापर्यंत पोहोचतात. PM २.५ फुफ्फुसाच्या आतील थरापर्यंत पोहोचतो, PM १० फुफ्फुसाच्या वरच्या भागावर परिणाम करतो. यामुळे डोळे, श्वासनळी आणि हृदयावर वाईट परिणाम होतो.

Alert! मुंबईतील या भागात फुफ्फुस, हृदय, डोळ्यांच्या समस्या, कारण काय? डॉक्टरांनी दिला सल्ला

PM २.५ आणि PM १० हे वेगवेगळ्या उत्सर्जन स्त्रोतांपासून बाहेर पडतात. यांची रासायनिक संरचनाही वेगळी असते. PM २.५ हे पार्टकिल्स गॅसोलीन, तेल, डिझेल इंधन किंवा लाकूड जाळल्यानंतर निघणारा धूर यातून तयार होतं. तर बांधकामाच्या ठिकाणी असलेली धूळ किंवा कचरा, औद्योगिक ठिकाणं आणि हवेतील धूळ, परागकण यापासून PM १० पार्टिकल तयार होतात.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.