Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कोकणातील रुग्णांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी; डॉक्टरांच्या टीमकडून मेंदूवर मायक्रोस्कोपिक यशस्वी शस्त्रक्रिया

6

Successful Brain Surgery In Ratnagiri : कोकणातील पहिली अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली आहे. रुग्णाच्या मेंदूवरील ट्यूमर शस्त्रक्रिया डेरवण रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने यशस्वी करण्यात डॉक्टरांना यश आलं आहे.

Lipi

प्रसाद रानडे, रत्नागिरी : कोकणातील चिपळूण वालावालकर हॉस्पिटलमध्ये आजवर अनेक अवघड शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्या आहेत. प्रथमच दुर्बिणीद्वारे एका लहान मुलीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. मेंदूतील ट्यूमर काढण्यात वैद्यकीय पथकाला मोठे यश आलं आहे. त्यामुळे आता कोकणातील रुग्णांना मुंबई – पुणे सारख्या मोठ्या शहरात जाऊन अवघड शस्त्रक्रिया आणि होणारा खर्च यासाठी मोठा दिलासा मिळाला आहे.

१२ वर्षीय मृण्मयी हिला १५ दिवस उलट्या होणं, भूक ना लागणं, डोकंदुखी असा त्रास होत होता. त्यामुळे तेथील स्थानिक डॉक्टरांनी तिला सलाईन लावल्या. यामुळे तिचं वजन १० किलोने घटलं. त्यानंतर अगदी हताश होऊन कृश अवस्थेत तिला शेवटचा पर्याय म्हणून वालावलकर रुग्णालयात आणलं. न्यूरोसर्जन मृदुल भटजीवाले यांनी मुलीला तपासून मेंदूचा एम.आर.आय केला आणि त्यात मेंदूच्या पाण्याच्या नलिकांमध्ये एक गाठ आढळली. ज्याला एपिण्डिमोमा असे म्हणतात.
Mumbai News : ५० डॉक्टरांची टीम, १० तास शस्त्रक्रिया; ‘केईएम’ रुग्णालयाने यशस्वी हृदयप्रत्यारोपण करत रचला इतिहास
त्याला सूज येऊन ती मेंदूवर दाब देत असल्याने मुलीला उलट्या होत होत्या. आता मृण्मयी अगदी बेशुद्ध पडण्याच्या अवस्थेत जाणार, त्या अगोदरच तिच्यावर अत्यतं क्लिष्ट पण योग्य आणि यशस्वी शस्त्रक्रिया केली गेली. शस्त्रक्रियेनंतर मृण्मयीची तब्येत झपाट्याने सुधारू लागली. उलट्या थांबल्या, तसंच ती चालू – फिरू लागली. आता तर ती पुन्हा शाळेत जाण्याचा विचार देखील करत आहे.
Organ Donation : बाराव्या वर्षी वैदेही गेली, पण चौघांना नवं आयुष्य देऊन, मुंबईकर बालिकेच्या पालकांचा स्तुत्य निर्णय
मृण्मयीवर झालेली ही जटिल मेंदूची शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत बीकेएल वालावालकर रुग्णालयात विनामूल्य करण्यात आली. डॉ. भटजीवाले आणि सहकारी डॉ. श्रेया टिबडेवाल, डॉ. सुधांशू सतीश राणे शस्त्रचिकित्सक आणि भूलतज्ञ डॉ. लीना ठाकूर आणि त्यांची टीम डॉ. अस्मिता, डॉ. सलोनी यांनी जबाबदारी उचलली.

या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे कोकणातील रुग्णांना आता मेंदूतील ट्यूमरच्या उपचारासाठी मुंबई किंवा पुण्यात जाण्याची गरज नाही. ही शस्त्रक्रिया जीव वाचवणारी होती. ती शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्यामुळे मृण्मयीचं जीवन वाचवण्यात यश आलं आहे. कोकणातील ही पहिली मायक्रोस्कोपिक मेंदूची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आहे.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.