Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Delta Plus Variant In Jalgaon: जळगावात डेल्टा प्लसचा शिरकाव; जिल्हाधिकाऱ्यांनी केले ‘हे’ महत्त्वाचे आवाहन
हायलाइट्स:
- जळगाव जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे सात रुग्ण.
- सातही रुग्ण आता ठणठणीत असल्याची माहिती.
- नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही: जिल्हाधिकारी
वाचा: चिंता वाढली; करोना संसर्गानंतर पुन्हा ‘या’ नव्या ‘व्हेरियंट’चा धोका
जळगाव जिल्ह्यात करोनाच्या नव्या डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण आढळून आल्याची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी दुपारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण उपस्थित होते. जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले की, करोना विषाणूच्या जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यातून १०० अशा प्रकारे साडेसात हजार रुग्णांचे नमुने एनआयव्ही कडे पाठवले होते. त्यात २१ रुग्णांच्या नमुन्यांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळला आहे.
वाचा: ‘सोनिया गांधींचा राग नको म्हणून तिसऱ्या आघाडीच्या बैठकीकडे शिवसेनेची पाठ’
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्ण
जळगाव जिल्ह्यातील ७ रुग्णांच्या नमुन्यांमध्येही हा व्हेरिएंट सापडला. हे सर्व रुग्ण हे एकाच भौगोलिक क्षेत्रातील आहेत. हे क्षेत्र ग्रामीण भागात मोडते. नवा व्हेरिएंट समोर आल्यानंतर संबंधित क्षेत्रात जिल्हा प्रशासनाच्या वतीने आरोग्य यंत्रणेची मदत घेऊन तातडीने रुग्णांच्या संपर्कातील लोकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात आले. दिलासादायक बाब म्हणजे, नव्या व्हेरिएंटमुळे त्या क्षेत्रात पॉझिटिव्हिटी वाढली नसल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. जिल्ह्याच्या एकूण पॉझिटिव्हिटी रेट प्रमाणेच त्या क्षेत्राचा पॉझिटिव्हिटी रेटही १.२१ टक्के इतका आढळला आहे. त्याचवेळी मृत्यूदरही वाढलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे, असेही जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.
गृहविलगीकरणातच ते रुग्ण बरे
डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या सातही रुग्णांना मे महिन्यात करोनाची लागण झाली होती. त्यांच्यात करोनाची लक्षणे नव्हती. ते गृहविलगीकरणातच उपचार घेतल्यानतंर बरे झाले. असे असले तरी नवा व्हेरिएंट किती धोकादायक आहे? त्यामुळे काही चिंताजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते का? याबाबत सखोल अभ्यासाची गरज असून एनआयव्ही, आयसीएमआर तसेच एनसीडीसी स्तरावर त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
वाचा: तुम्ही एकमेकांना जोडे मारा, पण…; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल