Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पारोळा | प्रतिनीध :- डॉ सँभाजीराजे पाटील समिती प्रमुख म्हणून निवडदेशाच्या स्वातंत्राला 75 वर्ष पूर्ण झाल्याने , हे वर्ष अमृत महोत्सव म्हणून देशभर साजरे व्हावे, आणि भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास प्रत्येक गावागावात तसेच प्रत्येक भारतीया पर्यंत पोहोचावा या उद्देशाने. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशभरात प्रत्येक जिल्यात आणि तालुक्यात समिती स्थापन करून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे. तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर एकत्र येऊन प्रजसत्ताक दिवस ते स्वातंत्र्य दिवस या कालावधीत तालुक्यात अनेक सामाजिक उपक्रम घेऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार आहे. पारोळा तालुका समितीप्रमुख डॉ श्री संभाजीराजे पाटील असून श्री देवीदास नामदेव वाणी हे सह प्रमुख म्हणून आहेत. त्याच बरोबर समिती सदस्य म्हणून श्री. अडव्होकेट भूषण मनोहर माने, श्री.रविंद्र पाटील सर- शीतल ऍकॅडमी, सी.ए. मुकेशजी चोरडिया, श्री.डाॅ.विशाल शेंडे, श्री.डाॅ.अनिल गुजराथी,श्री.डाॅ.सुदर्शन जैन, उद्योजक श्री.गोपाल शामलाल अग्रवाल, श्री.दिनेश गुजराथी, श्री.श्रीकांत रघुनाथ शिंपी – बालाजी संस्थान, श्री.राहुल साहेबराव निकम- टाइम्स ग्रुप, अडव्होकेट श्री. विशाल दत्तात्रय महाजन, श्री कैलास आनंदा चौधरी, श्री.विशाल महाजन- तरुण भारत, श्री.माणिकजी जैस्वाल त्याच बरोबर महिला सदस्य म्हणून सौ. अडव्होकेट क्रुतिका आफ्रे. सामाजिक कार्यकर्त्या सौ. प्रा. अन्नपूर्णा पाटील, सौ. शालिनी पवार व सौ.नेहा वैद्य. उपक्रम योगदान देतील. यावेळी तालुका कार्यवाहक श्री आकाश बाबूलाल बडगुजर, श्री प्रितेश जैन, श्री ज्ञानेश्वर बुंदे स्वयंसेवक पदाधिकारी उपस्थित होते.26 जानेवारी रोजी, सकाळी भारतमाता पूजन तसेच महापुरुष पुतळ्याना माल्यार्पण तथा अभिवादन , दीपोत्सव तसेच मशाल पेटवून “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाची सुरुवात करण्यात येईल। 15 ऑगस्ट पर्यंत वेळोवेळी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात नागरिकानी उस्फुर्त सहभाग घ्यावा असे आवाहन समिती प्रमुख डॉ सँभाजीराजे पाटील आणि समिती सदस्य यांनी केले असून सर्व कार्यक्रम कोरोना नियम पाळून साजरे केले जातील अशी माहिती यावेळी देण्यात आली