Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

विदेशी नोकरीचे आमीष दाखवुन विखरण च्या युवकाची फसवणुक..!

30



(शैलेश चौधरी)

एरंडोल: तालुक्यातील विखरण येथील सचिन ञ्यंबक अहीरे (वय-२८वर्षे) या युवकाच्या इ-मेल आय डी वर अज्ञात आरोपीकडून विदेशात नोकरीसाठी निवड झाल्याचे भासवुन ऑनलाइन पध्दतीने बँक खात्यात नोंदणी शुल्क भरण्यास सांगण्यात आले.
या प्रकरणी सचिन अहीरे यांची फसवणुक झाल्याबाबत एरंडोल पोलिस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन अहीरे यांनी नेहमीप्रमाणे नोकरीसाठी resume, express@jobagent.de या संकेतस्थळावर ऑनलाइन आवेदन केले असता वेळोवेळी अज्ञात आरोपीने सांगीतल्याप्रमाणे ऑनलाइन पध्दतीने बँकेत रकमेचा भरणा केला. परंतू काही दिवसांनी अज्ञात आरोपीकडून काही एक प्रतीसाद मिळाला नाही. mantelme@celicourt.uk या वर चौकशी केली असता सचिन याची फसवणुक झाल्याचे निष्पन्न झाले.
म्हणुन त्याने सरळ एरंडोल पोलिस स्टेशन गाठत परदेशी नोकरीच्या प्रलोभनास आपण बळी पडलो व आपली १लाख ८१हजार ५२५ रूपयांची अप्रामाणिकपणे संगणक साधनाद्वारे फसवणुक झाल्याची पोलिस स्टेशन ला तक्रार दिली.
याप्रकरणी पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव हे पुढील तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.