Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

स्थानिक गुन्हे शाखेकडुन हस्तगत मुद्देमाल मिळण्यासाठी समदाणी परीवाराकडुन पोलिस अधिक्षकांकडे अर्जाद्वारे मागणी..!

11

एरंडोल: तालुक्यातील कासोदा येथील स्वातंत्र्य सैनिक गणपती समदाणी यांच्या पत्नी ताराबाई गणपती समदाणी यांचे समदाणी गल्ली मधील पडित घराची माती २१ जानेवारी २०२२ रोजी भरली जात असतांना भिंतीला धक्का लागल्याने शेजारील भिंत पडली त्यामुळे सदर भिंतीचे दगडमाती भरत असतांना त्याठिकाणी पुरातन काळातील जवळपास वीस चांदीचे शिक्के ट्रॅक्टर चालकाला सापडले असता ते त्यांनी कासोदा पोलीस ठाण्यात जमा केले होते.

या घटनेची माहिती त्या गल्लीतील लोकांनी त्यांच्या मुलींना कळविल्यानंतर त्यांनी कासोदा पोलीसांशी संपर्क साधून माहीती घेतली असता फक्त वीस नाणी सापडल्याचे सांगण्यात आले.
परंतु संपूर्ण गावात गुप्तधन सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने घरमालक ताराबाई समदाणी यांचे जावाई व मुलगी प्रेमलता नवाल यांनी कासोदा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि निता कायटे यांच्याशी संपर्क करून विचारणा केली असता माहितीत तफावत वाटल्याने त्यांनी जळगाव पोलीस अधीक्षकांना सदरील घटनेची चौकशी करण्याची मागणी लेखी अर्जाद्वारे केल्याने पोलीस अधीक्षक यांनी जळगाव गुन्हे शाखेच्या पथकास २५ जानेवारी २०२२ रोजी कासोदा येथे पाठवल्याने गुन्हे शाखेच्या पथकाने जेसीबी चालक जितेंद्र बिरबल यादव, ट्रॅक्टर चालक ज्ञानेश्वर संतोष मराठे, संजय ऊर्फ सतिष साहेबराव पाटील, राहुल राजू भील या चौघांना जळगाव येथे नेले असता कासोदा पोलीसांवरच संशय व्यक्त करण्यात येत असुन स्थानिक पोलीसांनी याबाबत वेळीच कसुन चौकशी केली असती तर अजून जास्तीचा ऐवज मिळून आला असता अशी गावात चर्चा सुरु आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर घटनेची सखोल चौकशी केली असता यात जवळपास आजच्या बाजार भावाप्रमाणे १९ लाख १७ हजार २८३ रुपयांपर्यंत किंमत असलेला पुरातन काळातील सोन्याची दागीने व चांदीचे शिक्के आढळून आले. हे दागिने स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनी जालिंदर पळे यांच्या सोबत पोलीस नाईक नंदलाल पाटील,भगवान पाटील,राहुल बैसाणे,पोलीस अंमलदार सचिन महाजन,मुरलीधर बारी तसेच कासोदा पोलीस स्टेशनचे सपोनि निता कायटे यांच्यासह दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करून कारकून सहाय्यक फौजदार भास्कर बडगुजर यांच्या ताब्यात दिला. कासोदा सपोनि निता कायटे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव, तहसीलदार एरंडोल यांना कळविले असून पुढील कारवाई बाबत तालुका दंडाधिकारी यांना कळविले आहे.

आमचे वास्तुत कुठलीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे शिरून जेसीबीने माती भरतांना सापडलेले पुरातन शिक्के व सोने चांदीचे दागिने नेणाऱ्या सर्वांवर गुन्हा नोंद करून कोर्टात हजर करावे,आमच्या वस्तू आम्हास सुपूर्द करावे व प्रजासत्ताक दिनी स्वातंत्र सैनिकास न्याय मिळवून द्यावा अशी मागणी स्वातंत्र्य सैनिक पत्नी ताराबाई गणपती समदाणी यांची मुलगी प्रेमलता नवाल यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.