Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

kapil patil takes oath as a central minister for state: सरपंच ते केंद्रीय मंत्री; पाहा, कपिल पाटील यांचा राजकीय प्रवास!

21

हायलाइट्स:

  • कपिल पाटील यांना मिळाले केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान
  • सरपंचपदापासून सुरू केली राजकीय कारकिर्द
  • कपिल पाटील भाजपचा ओबीसी चेहरा

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. कपिल पाटील आता केंद्रात राज्यमंत्री झाले असून भाजपत प्रवेश केल्यानंतर त्यांनी आपले स्वत:चे स्थान निर्माण केले आहे.

असा झाला कपिल पाटील यांचा राजकीय प्रवास

भिवंडी तालु्क्यातील दिवे अंजूर गावच्या सरपंचपदावरून कपिल पाटील यांनी आपला राजकीय प्रवास सुरू केला. त्यानंतर त्यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही काम केले. यानंतर राष्ट्रवादीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांव्यतिरिक्त त्यांना मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपदही सोपविण्यात आले.

क्लिक करा आणि वाचा- काँग्रेसला दे धक्का! ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह यांचा भाजपत प्रवेश

सन २०१४ मध्ये कपिल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविली. भिवंडीमधून ते सन २०१४ ते २०१९ या काळात लोकसभेचे खासदारही होते.

कपिल पाटील यांचा भाजपला कोणता फायदा?

कपिल पाटील यांच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपला ओबीसी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कपिल पाटील हे देखील भाजपचे ओबीसी चेहरा आहेत. ठाणे आणि नवी मुंबईत बहुसंख्येने असलेल्या आगरी समाजाचे ते नेते आहेत. नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरे हे नाव न देता दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची त्यांनी मागणी केली होती. या मागणीसाठी आगरी समाज आक्रमक झाला आहे. या समाजातील नेत्याला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देऊन भाजप आता शिवसेनेला कमकुवत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

क्लिक करा आणि वाचा- ठाकरे सरकारचा अहंकार दुर्योधनाच्या अहंकारासारखा; फडणवीसांची टीका

कपिल पाटील यांचे राजकीय जीवन

जन्म- ५ मार्च १९६१
जन्मस्थान- भिवंडी
शिक्षण- बीए (मुंबई विद्यापीठ)
सरपंच- १९८८ ते १९९२ (ग्रामपंचायत दिवे अंजूर)
सदस्य- १९९२ ते १९९६ (पंचायत समिती भिवंडी)
अध्यक्ष- १९९७ ((पंचायत समिती भिवंडी)
सदस्य- २००२ ते २००७ (जिल्हा परिषद ठाणे)
अध्यक्ष- २००५ ते २००७ (जिल्हा परिषद कृषी समिती)
अध्यक्ष – २००९ ते २०१२ (जिल्हा परिषद ठाणे)
अध्यक्ष- ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

क्लिक करा आणि वाचा- कालचे दृश्य शरमेने मान खाली घालायला लावणारे; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले

या नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश…

१. नारायण राणे
२. सर्वानंद सोनोवाल
३. विरेंद्र कुमार
४. ज्योतिरादित्य शिंदे
५. रामचंद्र प्रसाद सिंह
६. अश्विनी वैष्णव
७. पशुपती कुमार पारस
८. किरेन रिजीजू
९. राज कुमार सिंह
१०. हरदीप सिंग पुरी
११. मुकेश मांडवीय
१२. भुपेंद्र यादव
१३. पुरुषोत्तम रुपाला
१४. जी. कृष्ण रेड्डी
१५. अनुराग सिंह ठाकूर
१६. पंकज चौधरी
१७. अनुप्रिया पटेल
१८. सत्यपाल सिंह बघेल
१९. राजीव चंद्रशेखर
२०. शोभा करंदलजे
२१. भानू प्रताप सिंह वर्मा
२२. दर्शना विक्रम जरदोश
२३. मिनाक्षी लेखी
२४. अन्नपूर्णा देवी
२५. ए. नारायणसामी
२६. कुशाल किशोर
२७. अजय भट्ट
२८. बी. एल. वर्मा
२९. अजय कुमार
३०. चौहान देवुसिन्ह
३१. भगवंत खुबा
३२. कपिल मोरेश्वर पाटील
३३. प्रतिमा भौमिक
३४. सुभाष सरकार
३५. भागवत किशनराव कराड
३६. राजकुमार रंजन सिंह
३७. भारती प्रवीण पवार
३८. बिश्वेश्वर तुडू
३९. शंतनू ठाकूर
४०. मंजुपारा महेंद्रभाई
४१. जॉन बर्ला
४२. मुरूगन
४३. निसिथ प्रामाणिक

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.