Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Pune १५ लाखाचा अवैध वाळू जप्त पुणे ग्रामीण LCB पथकाची कारवाई

8

तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख

पुुणे Online News तेज पोलीस टाइम्स पाटस ता.दौंड येथे सुमारे १५ लाखाचा अवैध वाळू जप्त : पुणे ग्रामीण LCB पथकाची कारवाई
मा.पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचे आदेशाने यवत पोलीस स्टेशन हद्दीत रेकॉर्डवरील पाहिजे, फरारी आरोपीचा शोध घेत असताना, स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास आज दिनांक ०९/०७/२०२१ रोजी पाटस, खारतोडे मळा स्मशान भूमीजवळ ता.दौंड जि.पुणे येथे कोणीतरी अज्ञात इसमाने बेकायदेशीरपणे वाळूचा मोठ्या प्रमाणात साठा केला असलेबाबत बातमी मिळाले वरून त्याठिकाणी जाऊन खात्री केली असता मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा मिळून आला. त्याबाबत माननीय तहसीलदार सो. दौंड यांना कळवून पाटस गाव कामगार तलाठी श्री. दिवेकर व दोन पंचांसमक्ष पंचनामा केला असता त्या ठिकाणी सुमारे बेकायदेशीर ३०० ब्रास वाळूचा साठा किं.रु. १५,००,०००/- (पंधरा लाख) चा मिळून आलेने तो जप्त करण्यात आलेला आहे.

Shifa mobile 9028293338


सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख सो., बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक श्री.मिलींद मोहिते सो., दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.राहुल धस सो. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट,सपोनि. सचिन काळे,पोहवा. महेश गायकवाड,पोहवा. निलेश कदम,पोहवा. सचिन गायकवाड,पोहवा. सुभाष राऊत,पोना. गुरू गायकवाड,पोना. अभिजित एकशिंगे,पोकॉ. दगडू विरकरयांनी केलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.