Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

द्राक्ष प्रक्रीया उद्योगाला सातारा मेगाफुड पार

26

सातारा,दि.०८:- (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादनाचा टक्का वाढतो आहे. त्यामुळे द्राक्ष पिकावरील प्रक्रीया उद्योगाला भविष्यात मोठी संधी आहे. प्रगतशील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना प्रक्रीया उद्योग सुरु करायचा असेल तर सातारा मेगा फुड पार्क द्राक्ष उत्पादकांना मदत करण्यास तयार असल्याचे प्रतिपादन बीव्हीजीचे ( भारत विकास गृप) चेअरमन हणमंतराव गायकवाड यांनी केले. बीव्हीजी ॲग्रोटेक कंपनीच्या वतीने ६ नोव्हेंबर रोजी सातारा मेगा फुड पार्क येथे सांगली जिल्ह्यातील द्राक्ष सल्लागारांसाठी मार्गदर्शनपर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बीव्हीजीच्या संचालिका रुपेल सिन्हा, बीव्हीजी  ॲग्रोटेक कंपनीचे प्रमुख अरुण बारगजे, ॲग्री ३६० चे सुभाष लोडे,  वरीष्ठ द्राक्ष सल्लागार राजकुमार ढवळे, उद्योजक सचिन करघने, सुरेश मोरे, डाळिंब बागायतदार संघाचे नानासाहेब माळी, शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष अजित साळुंके, प्रगतशील शेतकरी, जालिंदर सोळसकर , रमेश करढोने, उपस्थित होते.
यावेळी गायकवाड म्हणाले, ” बीव्हीजी ॲग्रोटेक कंपनीच्या वतीने सेंद्रीय शेतमाल निर्मितीसाठी कृषी निविष्ठांचे निर्माण केले जाते. याच कृषी निविष्ठा अत्यल्प दरात शेतकऱ्यांना उपलब्ध केल्या जातात. परिणामी उत्पादन खर्चात बचत होवून निर्यातक्षम द्राक्षांचे भरघोस उत्पादन घेता येते. शेतकरी बांधवांना द्राक्षाची निर्यात करायची असेल तर येणाऱ्या काळात बीव्हीजी ॲग्रोटेक कंपनीच्या वतीने सर्वोतोपरी मदत केली जाईल असे गायकवाड यांनी जाहीर केले.”
बारगजे म्हणाले, ” सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादनात द्राक्ष सल्लागारांचे बहुमुल्य योगदान आहे. मानवी आरोग्याच्या दृष्टीकोनातुन येणाऱ्या काळात रेसिड्यु फ्री अर्थात सेंद्रीय द्राक्ष उत्पादन ही काळाची गरज झाली आहे. त्यामुळे बीव्हीजी ॲग्रोटेक कंपनी द्राक्ष सल्लागारांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यास तयार आहे.
सदर चर्चासत्रात अनेक द्राक्ष सल्लागारांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. द्राक्ष पिकाचा उत्पादन खर्च कमी करुन , सेंद्रीय द्राक्ष उत्पादनासाठी द्राक्ष सल्लागार संघटना यापुढे कार्यरत राहणार असल्याचे मनोगत राजकुमार ढवळे यांनी व्यक्त केले.
बीव्हीजी ॲग्रोटेक कंपनीच्या कृषी निविष्ठा वापरल्याने उत्पादन खर्चात बचत होत असल्याचा अनुभव मला आहे. या आशयाची प्रतिक्रीया सचिन करघने यांनी नोंदवली.

Leave A Reply

Your email address will not be published.