Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

किती भारी दिसतेस, केबिनमध्ये ये… महिला सहकारी येताच शरीरसंबंधाची मागणी, पुण्यात चाललंय काय?

16

पुणे : पुण्यासारख्या शांतताप्रिय शहरात सध्या वारंवार गुन्हेगारीचे प्रकार उघडकीस येताना दिसत आहेत. त्यामुळे पोलिसांपुढे आणि कायद्यापुढं मोठं आव्हानं उभं राहिलं आहे. असाच एक धक्कादायक प्रकार एका पंचतारांकित हॉटेलमध्ये घडला आहे. हॉटेलच्या मॅनेजरने सहकारी महिलेस केबिनमध्ये बोलावून तिच्याकडे शरीरसंबंधाची मागणी करुन बळजबरीने मिठी मारुन विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी एका २५ वर्षीय तरुणीने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राहुल पांडुरंग सानप ( वय ३२, रा. बी टी कवडे रोड) आणि विनोद पवार (वय ३८, रा. केशवनगर, मुंढवा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या एका हॉटेलमध्ये काम करतात. त्याच हॉटेलमध्ये राहुल सानप हा मॅनेजर आहे. राहुल सानप याची फिर्यादीवर वाईट नजर होती. त्यामुळेच राहुल सानप याने फिर्यादीला आपल्या केबिनमध्ये बोलवले. ‘तू खूप सुंदर दिसते. तुझे पाय किती भारी आहेत, माझे घर खूप मोठे आहे. रात्री माझ्या घरी चल आपण… असं म्हणत राहुलने थेट फिर्यादीला मिठी मारत तिचा विनयभंग केला. काही फिर्यादीने याची कुठे वाच्यता केली नाही.

हा प्रकार इथेच थांबला नाही, यातील दुसरा आरोपी विनोद पवार याने फिर्यादी कामावरुन घरी जात असताना पाठलाग केला. तिला तो ‘ये सेक्सी गर्ल, राहुलची इच्छा पूर्ण कर आणि राहुलने तुझ्यासोबत जे काही केले, ते तू कोणाला सांगायचे नाही.. तू कोणाला सांगितले तर आम्ही तुला खल्लास करुन टाकू’ अशी धमकी दिली. त्यानंतर घाबरुन फिर्यादने पोलीस स्टेशन गाठलं. हा सारा प्रकार मुंढवा रोडवरील एका तारांकित हॉटेलमध्ये सप्टेंबर २२ ते २७ डिसेबर २०२२ दरम्यान घडला. पोलीस उपनिरीक्षक भोसले पुढील तपास करीत आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.