Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

उपसरपंचपदाच्या निवडीत सरपंच मतदान करू शकणार का? राज्य सरकारने केले स्पष्ट

20

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून उपसरपंच निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात डिसेंबर महिन्यात विविध जिल्ह्यांमधील ७७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची प्रक्रिया पार पडली होती. राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर सरपंच निवडणुकीसंदर्भातील नियम बदलण्यात आला होता. सरपंचांची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणं सरपंचपदासह ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या आहेत. आता सर्वाचं लक्ष उपसरपंच निवडणुकीकडे लागलं होतं. उपसरपंच निवडणुकीसंदर्भातील यवतमाळच्या जिल्ह्याधिकाऱ्यांच्या पत्राला ग्रामविकास विभागानं दिलेलं उत्तर समोर आलं असून त्यातून उसरपंच निवडणुकीसंदर्भातील मुद्दे निकाली निघाली आहेत.

सरपंचांना मतदानाचा अधिकार असेल का?

ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये पहिल्या फेरीत सरपंच यांना मतदानाचा अधिकार असेल, असं ग्रामविकास विभागानं स्पष्ट केलं आहे. दोन उमेदवारांना उपसरपंचपदासाठी समसमान मते पडल्यास सरपंचाला निर्णायक मत देण्याचा हक्क असेल.

उपसरपंचपदाची निवडणूक सरंपचांच्या अध्यक्षतेखाली

महाराष्ट्राच्या ग्रामविकास विभागानं उपसरपंचाची निवडणूक ही सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली घेणे व उपसरपंच यांची निवड करणे कायदयाने बंधनकारक असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं उपसरपंच निवडणुकीचे अध्यक्षस्थान भूषवून त्याप्रमाणे कार्यवाही करणे हे सरपंच यांच्या कर्तव्याचा भाग आहे, असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे.

वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पुण्यात दाणादाण, सिग्नल बंद पडून ट्राफिक जाम, उद्योगही ठप्प

उपसरपंच पदाच्या निवडणुकीची सभा तहकुब झाल्यास मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियम (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम, १९६४ च्या नियम १२ मधील तरतुदीनुसार सदरची सभा त्या कारणासाठी दुसऱ्याच दिवशी तात्काळ घेण्यात यावी, अशा सूचना देखील ग्रामविकास विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

सरपंच गैरहजर राहणार असल्यास काय?

उपसरपंचाच्या निवडणुकीसाठी अपरिहार्य कारणास्तव सरपंच उपस्थित राहण्यास असमर्थ असतील तर जिल्हाधिकारी यांनी सदर कारणाची खातरजमा करुन महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ चे कलम ३३ मधील पोट कलम ६ (४) मधील तरतुदीस अनुसरुन तात्काळ पीठासीन अधिकारी यांची नियुक्ती करावी, अशा सूचना ग्रामविकास विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

Closing Bell: अमेरिकेत बैठक, भारतीय शेअर बाजारात खळबळ; सेन्सेक्स ६५० अंकांनी घसरून बंद

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ मधील कलम ३३ नुसार सरपंच व उपसरपंच यांच्या निवडणुकीची कार्यपध्दती निश्चित करण्यात आलेली आहे

महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा, फडणवीसांसोबतची चर्चा यशस्वी

दाजींकडून नवनिर्वाचित सरपंचांना मोलाचा सल्ला, तर भाषणादरम्यान कराड यांची फिरकी!

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.