Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुणे,दि.04 :- पुणे शहरांतील मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सुरु असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर पुणे शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला आहे.व कारवाई करुन 26 जणांना ताब्यात घेऊन 1 लाख 3 हजार 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.सामाजिक सुरक्षा विभागाला मंगळवार (दि.3) मुंढवा परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये कल्याण मटका जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती मिळाली. पथकाने पाळत ठेवून जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्यावेळी 26 जणांना जुगार खेळताना ताब्यात घेण्यात आले. या कारवाई पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल, मटका जुगाराचे साहित्य असा एकूण 1 लाख 3 हजार 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. महाराष्ट्र जुगार अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींवर पुढील कारवाई करीता मुंढवा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त,संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे,रामनाथ पोकळे,पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे यांचे मार्गदर्शना खाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार तसेच सपोनि.अश्विनी पाटील, सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार, अजय राणे, आण्णा माने, पुष्पेंद्र चव्हाण, संदीप कोळगे व अमित जमदाडे या पथकाने यशस्वी केली आहे.