Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अखेर चीनने आपले फासे टाकले, AI द्वारे जगावर हुकूमत गाजवणार, जाणून घ्या संपूर्ण प्लान

8

नवी दिल्लीः एकेकाळी चीनने डिजिटल जगात आपली दमदार एन्ट्री केली होती. चीनचा दरारा पाहून अमेरिका आणि यूरोप मधील अनेक देशांना जोरदार झटका बसला होता. भारतात सुद्धा चीनच्या डिजिटल वर्ल्ड मुळे चिंता व्यक्त केली जात होती. चीनच्या दादागिरीवर आळा घालण्यासाठी भारत आणि अमेरिकेसारख्या देशात चीनी उत्पादनांवर बंदी घालण्यासारखा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, आता चीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI च्या जगात नेतृत्त्व करण्याच्या प्रयत्नात आहे.

गेल्या काही दिवसांपासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI वरून जगभरात चर्चा सुरू आहे. खास करून एआय बेस्ड सर्च इंजिन प्लॅटफॉर्म ChatGPT ची खूप चर्चा होत आहे. परंतु, हे ChatGPT एक नमूना आहे. आगामी दिवसात यासारखे असे अनेक अॅप्स आणि डिव्हाइस येतील. जे की, आर्टिफिशियल इंटेलिजेंस बेस्ड असतील. गेमिंग, इंन्शूरन्स, सर्चिंग सारख्या सेक्टरमध्ये एआय एन्ट्री करतील.

AI पेटेंट मध्ये चीनने मारली बाजी

चीनी कंपन्यांकडून गेल्या काही वर्षात सर्वात जास्त संख्येत आर्टिफिशियल पेटेंटला फाइल करण्यात आले आहे. चीनी कंपनी Tencent कडून सर्वात जास्त 9,614 AI पेटेंटला फाइल करण्यात आले आहे. तर दुसऱ्या नंबर वर चीनची अन्य कंपनी Baidu आहे. जिने AI चे 9,504 पेटेंटला फाइल केले आहे. याशिवाय, चीनी इंशूरेन्स कंपनी Ping An ने 6,410 AI बेस्ड पेटेंटला फाइल केले आहे. या लिस्टमध्ये IBM आणि Samsung सारख्या कंपन्या मागे पडताना दिसत आहेत. तर Microsoft कंपनी ६ व्या स्थानावर आहे. तर Alphabet कंपनी ७ व्या स्थानावर आहे. या पेटेंटला २०१७ ते २०२१ या दरम्यान फाइल करण्यात आले आहे.

वाचाः फोनवर फक्त एक मेसेज पाठवून लोकांच्या अकाउंटमधून काढले जाताहेत पैसे, या चुका टाळा

कोणी किती पेटेंट केले फाइल
Tencent – ९,६१४
Baidu – ९,५०४
IBM – ७,३४३
Samsung – ६,८८५
Ping An – ६,४१०
Microsoft – ५,८२१
Alphabet – ४,०६८

वाचाः Airtel ने लाँच केले दोन स्वस्त प्लान, ६० जीबी पर्यंत मिळतोय डेटा, अनलिमिटेड कॉलिंग

काय आहे पेटेंट
खरं म्हणजे तुम्ही कोणतेही इनोव्हेशन करीत असता. म्हणजेच एखादी नवीन गोष्ट बनवत असता त्यासाठी सर्वात आधी रजिस्ट्रेशन करावे लागते. कारण, तुम्ही जे बनवले आहे. त्याची अन्य दुसऱ्याने कुणी कॉपी करून त्यावर दावा सांगू नये. यासाठी काहीही नवीन बनवले असल्यास त्याचे सर्वात आधी रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे.

वाचाः महिनाभरात जिओ आणि एअरटेलला मिळाले २५ लाख नवीन ग्राहक, वोडाफोनला १८ लाख ग्राहकांचे नुकसान

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.